लिओनेल मेस्सीच्या अवैध गोलमुळे सामन्याचा निर्णयच बदलला

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

गिओवान लो सेल्सो याच्या बॅक पासवर मेस्सीने चेंडूला अचूक दिशा दिली होती, पण या चालीच्या सुरुवातीस गोंझालेझकडून फाऊल झाल्याचे सांगत ब्राझीलच्या रेफरींनी गोल नाकारला.

ला बॉम्बेनेरा-  लिओनेल मेस्सीने केलेला गोलच अवैध ठरवण्यात आल्याने अर्जेंटिनाला फूटबॉल विश्वचषक पात्रता स्पर्धेत पॅराग्वेविरुद्ध बरोबरीस सामोरे जावे लागले.

पॅराग्वेला अॅगेल रोमारिओ याने पेनल्टीवर गोल करत आघाडी मिळवून दिली. मात्र, अर्जेंटिनाकडून गोंझालेझने सुंदर गोल करत सामन्यात बरोबरी साधून दिली. गिओवान लो सेल्सो याच्या बॅक पासवर मेस्सीने चेंडूला अचूक दिशा दिली होती, पण या चालीच्या सुरुवातीस गोंझालेझकडून फाऊल झाल्याचे सांगत ब्राझीलच्या रेफरींनी गोल नाकारला.

गोल नाकारला गेल्याने मेस्सी कमालीचा निराश झाला होता. त्यातच काही वेळातच त्याने फ्री किकवर अचूक दिशा दाखवलेला चेंडू उडी मारलेल्या गोलरक्षकाच्या बोटाला लागून  क्रॉसबारला लागून परतला.
 गोल कनवर्ट न झाल्याने लिओनेल मेस्सी कमालीचा निराश झाला होता. त्यानंतर काही वेळाने फ्री किकवर अचूक दिशा दाखवलेला चेंडू गोलकीपरच्या अतिशय चपळ रक्षणामुळे अडवला गेला. यामुळे सुमारे नव्वद मिनिटांच्या खेळानंतरही सामना अनिर्णयीत अवस्थेत सुटला. 

संबंधित बातम्या