Argentina: कल्ला होणारच! तब्बल 36 वर्षांनी वर्ल्डकप अर्जेंटिनात, पाहा राजधानीतील थक्क करणारी दृश्य

अर्जेटिनाने वर्ल्डकप जिंकताच ब्यूनस आयर्स शहरात लाखो चाहते रस्त्यावर उतरले होते.
Argentina fans at Buenos Aires
Argentina fans at Buenos AiresDainik Gomantak

FIFA World Cup 2022: रविवारी कतारमधील लुसैल स्टेडियमवर फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेतील अंतिम सामना अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स यांच्यात पार पडला. जवळपास 3 तास चाललेल्या या सामन्यात अर्जेंटिनाने रोमांचकारकरित्या फ्रान्सवर पेनल्टी शुटआऊटमध्ये 4-2 अशा गोलफरकाने हा सामना जिंकला.

त्यामुळे अर्जेंटिनाने तब्बल 36 वर्षांनी विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. यापूर्वी अर्जेंटिनाने अखेरचा वर्ल्डकर 1986 साली जिंकला होता. तसेच हा अर्जेंटिनाचा तिसरा विश्वविजय आहे. त्यांनी सर्वात आधी 1978 साली विश्वविजेतेपद जिंकले होते.

Argentina fans at Buenos Aires
FIFA World Cup: अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा जिंकला वर्ल्डकप, एका क्लिकवर जाणून घ्या आजपर्यंतचे विजेते

दरम्यान, कारकिर्दीतील पाचवा वर्ल्डकप खेळणारा अर्जेटिनाचा कर्णधार लिओनल मेस्सीचेही विश्वविजयाचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. त्यामुळे सर्वच योगायोग जुळून आल्याने अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनस आयर्स या शहरात अक्षरश: चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहचला होता.

ब्यूनस आयर्स शहर संपूर्ण चाहत्यांच्या गर्दीने भरून गेले होते. तसेच ठिकठिकाणी स्क्रिनवर सामने सुरू होते. तसेच अर्जेंटिनाने विश्वविजेतेपद जिंकल्यानंतर लाखो चाहते रस्त्यावर उतरले होते. त्यांनी मोठमोठ्याने नारे देत जल्लोषही केला. त्यांच्या जल्लोषाचे व्हिडिओ सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.

अर्जेंटिनाचा रोमांचकारी विजय

अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने चांगली सुरुवात केली होती. त्यांनी आक्रमक खेळ करताना फ्रान्सला पहिल्या हाफमध्ये बॅकफुटवरच ठेवले होते. पहिल्याच हाफमध्ये मेस्सीने 23 व्या मिनिटालाच अर्जेंटिनाला गोलचे खाते उघडून दिले. त्यानंतर एंजेल डी मारियाने अर्जेंटिनासाठी 36 व्या मिनिटाला दुसरा गोल केला.

मात्र, दुसऱ्या हाफमध्ये फ्रान्सचा युवा फुटबॉलपटू कायलिन एमबाप्पेने दमदार खेळ दाखवत 80 आणि 81 व्या मिनिटाला सलग दोन गोल केले आणि फ्रान्सला बरोबरी साधून दिली. त्यामुळे सामना ज्यादा वेळेत गेला. ज्यादाच्या वेळेतही मेस्सी आणि एमबाप्पेने प्रत्येकी 1 गोल केल्याने 3-3 अशी बरोबरी झाली.

अखेर पेनल्टी शुटआऊटमध्ये अर्जेंटिनाने 4-2 अशा फरकाने फ्रान्सवर मात केली. पेनल्टी शुटआऊटमध्ये अर्जेंटिनाकडून मेस्सी, डायबाला, पॅरेडेस आणि माँटिएल यांनी गोल केले, तर फ्रान्सकडून केवळ एमबाप्पे आणि कॉलो मुआनीला गोल करता आला. त्यामुळे अखेर विश्वविजयाची माळ अर्जेंटिनाच्या गळ्यात पडली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com