'हॅंड ऑफ गॉड' हरपला..!

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

दिएगो मॅरोडाना विश्‍व फुटबॉलला पडलेले एक स्वप्न होते. झोपटपट्टीत जन्म झालेल्या दिएगो जागतिक फुटबॉलचे हिरो झाले. तेवढीच त्यांची कारकिर्दही वादग्रस्त ठरली. चरसपासून गांजापर्यंत जडलेली व्यसने त्यांचा घात करणारी ठरली.

ब्युनोस आर्यस : दिएगो मॅरोडाना विश्‍व फुटबॉलला पडलेले एक स्वप्न होते. झोपटपट्टीत जन्म झालेल्या दिएगो जागतिक फुटबॉलचे हिरो झाले. तेवढीच त्यांची कारकिर्दही वादग्रस्त ठरली. चरसपासून गांजापर्यंत जडलेली व्यसने त्यांचा घात करणारी ठरली. १९९८ मध्ये त्यांनी अर्जेंटिनाला विश्‍वविजेतेपद मिळवून देताना विश्‍व फुटबॉलमध्ये क्रांती केली, परंतु हे यश त्यांना पचवता आले नाही. १९९४ च्या विश्‍वकरंडक स्पर्धेत त्यांना उत्तेजकाच्या सेवनामुळे बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर मॅरोडोना ‘ड्रग एडिग्ट’ होत गेले.

दिएगो मॅरेडोना यांचा जन्म ३० ऑक्‍टोबर १९६० रोजी ब्युनोस आर्यस येथे एका कंपनी कर्मचारी असलेल्या अर्मांडो आणि दालमा यांच्या कुटूंबात झाला. अर्मांडो-दालमा यांना असलेल्या आठ मुलांमध्ये दिएगो पाचवे आपत्य होते. आई दालमा आपल्या या मुलाला डोना टोटा या नावाने ओळखायची. चर्चच्या फरशीवर कमालीचे पदललित्य दाखवणाऱ्या आपल्या मुलाममध्ये असलेली चपळता दालमा यांनी त्याच वेळी ओळखली होती. फुटबॉलच्या चेंडूवर दिएगो यांना लहानपणापासून कमालीचे आकर्षण होते. भेट मिळालेला पहिला फुटबॉल ते रात्री हाताजवळ घेऊन झोपत होते.
रस्त्यावरुन चालता चालता पायातील कौशल्य दाखवत असलेल्या आणि मिळेल त्या वस्तूबरोबर फुटबॉल खेळणाऱ्या दिएगो यांच्या नसासनात फुटबॉल खेळ भरला होता १५ व्यावर्षीच त्यांना अर्जेंटिनिओस ज्युनियर या प्रथम श्रेणी क्‍लबमधून खेळण्याची संधी मिळाली.
 

हॅंड ऑफ गॉड

मॅराडोनाच्या हॅंड ऑफ गॉड गोलमुळे १९८६ च्या स्पर्धेत अर्जेंटिनाचा इंग्लंडविरुद्ध विजय या वेळी मॅराडोनाने चेंडू हेडर केल्याचे दिसले, पण रिप्ले पाहिल्यावर प्रत्यक्षात मॅराडोनाने तो चेंडू हाताने मारला असल्याचे दिसले. मॅराडोनाने यास हॅंड ऑफ गॉड असे संबोधले ब्रिटन आणि अर्जेंटिना यांच्यातील फॉकलंड वॉरनंतर चार वर्षांत मेक्‍सिकोच्या १९८६ च्या स्पर्धेतील ही लढत मॅराडोनाने या लढतीत दोन गोल केले; पण त्यातील हॅंड ऑफ गॉड जास्त संस्मरणीय ठरला.

वर्ल्डकपचा इतिहास...
१९७८ च्या विश्‍वकरंडक स्पर्धेत वयाच्या १७ व्या वर्षी अर्जेंटिनाकडून खेळण्याची संधी थोडक्‍यात हुकली होती. १९८२ च्या स्पर्धेत ब्राझीलकडून झालेल्या पराभवामुळे अर्जेंटिनाचे आव्हान संपुष्टात आले होते. १९८४ मध्ये इटलीत लीग स्पर्धेत त्यांना नापोली क्‍लबशी ७.५ दशलक्ष डॉलरचा करार केला. त्यावेळी कमकूवत असलेल्या या क्‍लबला त्यांनी स्वतःच्या जादूई खेळाच्या जोरावर दोनदा विजेतेपद मिळवून दिले होते. त्यानंतर १९९० च्या स्पर्धेतही आपल्या अर्जेंटिना संघाला अंतिम फेरी गाठून दिली होती, परंतु यावेळी दैवाने हात (हॅंड ऑफ गॉड) दिला नाही.

मॅराडोना हा आमच्या पिढीतीलच नव्हे, तर सार्वकालिक सर्वोत्तम खेळाडू होता. त्याला दैवाची साथ होती; पण अनेकदा तो वादात अडकला. आता त्याच्या आत्म्याला शांती मिळेल.
- गॅरी लिनेकर 

माझा हिरो आता नाही. मी ज्याच्यावर मनापासून प्रेम केले, त्यानेच निरोप घेतला. मी केवळ त्याच्यासाठी फुटबॉल पाहिले.
- सौरव गांगुली

एक चांगला मित्र गमावला. एक सर्वोत्तम फुटबॉलपटू आपल्यातून गेला आहे. त्याच्याबाबत खूप काही बोलता येईल; पण सध्या काही सुचत नाही. मी आणि मॅराडोना नक्कीच आकाशात एकमेकांबरोबर फुटबॉल खेळणार आहोत.
- पेले

फुटबॉलच नव्हे, तर क्रीडाजगताने सर्वोत्तम खेळाडू गमावला आहे. दिएगो मॅराडोनाची उणीव आपल्याला सतत भासत राहणार.
- सचिन तेंडुलकर

शतकातील सर्वोत्तम गोल

मॅराडोनाचा हॅंड ऑफ गॉड गोल ब्रिटन तसेच युरोपातील माध्यमांनी जास्त प्रसिद्ध केला; पण १९८६ च्या विश्वकरंडक स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात मॅराडोनाने केलेला गोल विसाव्या शतकातील सर्वोत्तम गोल ठरवला गेला. मॅराडोना अर्जेंटिनाच्या क्षेत्रात चेंडू स्वीकारला आणि वेगाने ड्रिबल करीत चार इंग्लंड बचावपटूंना चकवले. त्याच्या वेगवान किकने इंग्लंडचा गोलरक्षक शिल्टन चकला. खरे तर मॅराडोनाने ज्या वेळी किक मारली, त्या वेळी इंग्लंडचा बचावपटू त्याच्या मार्गात होता; पण मॅराडोनाने चेंडू गोलजाळ्यात धाडला तो जवळपास झिरो अँगलमधून असेच अनेकांचे  मत होते.

अधिक वाचा : 

जगद्विख्यात फुटबॉलपटू दिएगो मॅरोडाना यांचे निधन

पेनल्टी गोलमुळे मुंबई सिटी एफसीचा आयएसएलमधील पहिला विजय ; एफसी गोवावर 1-0  ने मात

आज नॉर्थईस्टसमोर केरळा ब्लास्टर्सचे खडतर आव्हान

संबंधित बातम्या