Arjun Tendulkar मुंबई सोडणार, आता गोवेकर म्हणून ओळखला जाणार...

अर्जुन तेंडुलकर मुंबई सोडून गोव्यातून खेळू शकतो, जाणून घ्या काय आहे कारण
Arjun Tendulkar
Arjun Tendulkar Dainik Gomantak

Arjun Tendulkar : आयपीएलमध्ये गेली दोन वर्षे मुंबई इंडियन्सचा सदस्य असलेला महान खेळाडू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरबद्दल एक मोठे आणि महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. अर्जुन तेंडुलकर आता मुंबई सोडून गोवा संघाकडून खेळू शकतो, अशी माहिती मिळाली आहे. त्यासाठी त्याने मुंबईतून एनओसीही मागितली आहे.

अर्जुन तेंडुलकरला आपल्या संघात समाविष्ट करण्यासाठी गोवा संघाच्या वतीने पाचारण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे, त्यानंतर अर्जुनने एनओसीसाठी अर्ज केला आहे. आयपीएलमध्ये अर्जुन तेंडुलकर दोन वर्षांपासून मुंबई इंडियन्स संघात आहे, मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.

Arjun Tendulkar
IND Vs ZIM: भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी झिम्बाब्वेचा संघ जाहीर

अर्जुन तेंडुलकर डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी करतो

दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत आहे. पुढील देशांतर्गत हंगामात तो गोव्यासाठी खेळू शकतो, अशी शक्यता आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा एक भाग होता. त्याने 202-21 मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हरियाणा आणि पुद्दुचेरी विरुद्ध मुंबईसाठी दोन सामने खेळले. ज्युनियर तेंडुलकरने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे ना हरकत प्रमाणपत्रासाठी (NOC) अर्ज केल्याचे कळते.

एसआरटी स्पोर्ट्स मॅनेजमेंटने एका निवेदनात म्हटले आहे की, अर्जुनला त्याच्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर जास्तीत जास्त वेळ मैदानावर घालवणे महत्त्वाचे आहे. दुसऱ्या स्थानावरून खेळल्याने अर्जुन तेंडुलकरला अधिक स्पर्धात्मक सामने खेळण्याची संधी मिळेल. तेव्हा या नव्या प्रवासातून अर्जून क्रिकेट कारकिर्दीच्या नव्या पर्वात प्रवेश करणार आहे.

अर्जुन तेंडुलकरने तीन हंगामापूर्वी भारत 19 वर्षाखालील श्रीलंकेविरुद्ध दोन सामने खेळले होते. त्यावेळी मुंबईच्या मर्यादित षटकांच्या संभाव्य संघातही त्याचा समावेश होता. अर्जुनसाठी सर्वात मोठी निराशा म्हणजे या मोसमात त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी न मिळाल्याने मुंबई संघातून वगळण्यात आले. गोवा क्रिकेट असोसिएशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अर्जुन तेंडुलकरचा राज्यातील संभाव्य खेळाडूंमध्ये समावेश केला जाऊ शकतो.

जीसीएचे अध्यक्ष सूरज लोटलीकर यांनी पीटीआयला सांगितले की, आम्ही डावखुरा वेगवान गोलंदाज शोधत आहोत. म्हणूनच आम्ही अर्जुन तेंडुलकरला गोवा संघात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. हंगामापूर्वी आम्ही मर्यादित षटकांचे सराव सामने खेळू आणि तो या सामन्यांमध्ये खेळेल. या सामन्यातील त्याच्या कामगिरीच्या आधारे निवड समिती त्याला संघात ठेवण्याचा निर्णय घेतील.

Arjun Tendulkar
FIFA World Cup 2022 या दिवशी होणार सुरू, कतार संघाच्या सामन्याने होणार सुरुवात

अर्जुन तेंडुलकरला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने 20 आणि 30 लाख रुपयांना खरेदी केले होते. परंतु त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. यानंतर आयपीएल 2022 साठी मेगा लिलाव झाला तेव्हा मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला 30 लाख रुपयांना विकत घेतले होते, यावेळी तो निश्चितपणे एक-दोन सामने खेळेल अशी शक्यता होती, परंतु यावेळीही तो खेळू शकला नाही. स्वत: सचिन तेंडुलकरही दीर्घकाळ मुंबई इंडियन्सकडून खेळला असून संघाचे नेतृत्वही केले आहे. मात्र आता अर्जुन तेंडुलकर गोव्याच्या संघात गेला तर त्याला खेळण्याची संधी मिळते की नाही,पुढील वर्षीच्या आयपीएलमध्ये अर्जुन तेंडुलकर कोणत्या संघात सामील होतो हे येणाऱ्या काळात बघायला मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com