विजय हजारे ट्रॉफीसाठी अर्जून तेंडुलकर संघाबाहेर

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू उत्कृष्ट फलंदाज सचिन तेंडुलकरने नुकतेच शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्विट केल्यामुळे तो वादात सापडला होता. आता पुन्हा सचिन तेंडुलकरसाठी एक वाईट बातमी आहे

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू उत्कृष्ट फलंदाज सचिन तेंडुलकरने नुकतेच शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्विट केल्यामुळे तो वादात सापडला होता. आता पुन्हा सचिन तेंडुलकरसाठी एक वाईट बातमी आहे. मुलाच्या करिअरची कोणताही पालक काळजी असतोच अशीच चिंता आता सचिनला आपल्या मुलाविषयी लागली आहे. चिंतातूर असलेल्या सचिनला एका मोठ्या बातमीचा धक्का बसला आहे, मुंबई क्रिकेट संघातून त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला काढून टाकण्यात आले आहे.सचिन तेंडुलकर जरी एक उत्कृष्ट फलंदाज असला तरी त्याचा मुलगा एक जलद गोलंदाजीसाठी ओळखला जातो. कधीकधी तो फलंदाजीही करतो. मात्र नुकत्याच मुंबईत झालेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या सराव सामन्यात अर्जुन तेंडुलकर विशेष कामगिरी दाखवू शकला नाही, त्यामुळे त्याला विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबई क्रिकेट संघात स्थान देण्यात आलेले नाही.

याच वर्षी अर्जुन मुश्ताक अली स्पर्धेत पदुच्चेरी आणि हरियाणा या संघांविरुद्ध खेळला होता. याच खेळातील त्याच्या कामगिरीमुळे अर्जुन आयपीएलच्या लिलावासाठी पात्र ठरला होता. यावर्षी होणाऱ्या आयपीएलच्या मिनी लिलावात त्याच्यावर बोली देखील लागणार आहे.प्रत्येकच पालकाला आपल्या मुलांच्या करिअरची भविष्याची चिंता असते तशीच ती सचिनला देखील आहे. अर्जून एका यशस्वी क्रिकेटपटूचा मुलगा असल्याने अर्जुनला तेवढे चांगले मार्गदर्शनही त्याला लाभले आहे, तसेच त्याला यासंदर्भात कधी कधी दडपणही सहन करावे लागत असेल. तेव्हा तो या क्रिकेट विश्वात कितपत यशस्वी ठरतो यावर शंका वर्तविली जात  यंदा

यावर्षी होणाऱ्या आयपीएलच्या लिलावासाठी अर्जुन तेंडुलकरची बेस प्राईजही ठरवण्यात आलेली आहे. 20  लाख रुपये इतकी त्याची बेस प्राईज असणार आहे. काही संघ अर्जुनवर बोली लावतील अशी शक्यता आहे. यामध्ये संघांमध्ये अंबानींच्या मुंबई इंडियन्सचे नाव सर्वात आघाडीवर आहे.अर्जुन तेंडुलकरवर संघ बोली लावणारा संघ कोणता असणार याकडे संपूर्ण क्रिकेट क्षेत्राचे लक्ष लागून आहे. जर अर्जूनवर कुणीही बोली लावली नाही तर त्याला कोणताही संघ त्याच्या बेस प्राईजवर आपल्या संघात सहभागी करुन घेऊ शकतो.दुसरीकडे सचिन तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर या बापलेकासाठी जरी ही गुडन्यूज असली तरी  ही बातमी कळताच दोनच दिवसात मुंबई संघाने त्याच्यावर अविश्वास दाखवला आहे.

विजय हजारे स्पर्धेच्या सराव सामन्यात अर्जुनला 4.1 षटकात एकही बळी त्याला घेता आलेला नाही, याउलट त्याने 53 धावा दिल्या होत्या, त्यामुळे अर्जूनला विजय हजारे स्पर्धेसाठी मुंबई संघातून वगळण्यात आले आहे.मुंबई संघाने अर्जुन तेंडुलकरला आपल्या संघातून वगळल्याने त्याला आता सरावासाठी वेळ मिळणार आहे.  आयपीएलच्या लिलावात त्याच्यावर कोणता संघ बोली लावणार हे वेळेनुसार समजेलच त्याचबरोबर त्याच्या सुमार कामगिरीमुळे कुणी त्याला संघात घेणार की नाही हेही कळेल, मात्र असे असले तरी मुंबई संघाने अर्जुन तेंडुलकरला आपल्या संघातून वगळल्याने आयपीएलसाठी सराव करण्यास त्याला आता भरपूर वेळ मिळणार असल्याच बोलले जात आहे.

 

 

संबंधित बातम्या