पॅरा टेबल टेनिस खेळाडू भाविनाला अर्जुन पुरस्कार

पॅरा टेबल टेनिस खेळाडू भाविनाला अर्जुन पुरस्कार

पॅरालिंपिकमध्ये टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी भाविना पटेल पहिली भारतीय ठरली

पॅरा टेबल टेनिस खेळाडू भाविनाने यावर्षी टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. पॅरालिंपिकमध्ये टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. आणि तीला क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च अर्जुन पुरस्कारान् सन्मानिक करण्यात आले आहे. तीच्याकडे संपूर्ण देश जिगरबाज खेळाडू म्हणून पाहत आहे.

‘मला प्रशिक्षकांनी सांगितले होते, की मी एकदिवस नक्कीच अर्जुन पुरस्काराची मानकरी ठरेन. त्यांचे शब्द आज खरे झाले. हा पुरस्कार भारतीय क्रीडाक्षेत्रातील सर्वोत्तम असल्याने माझ्यासाठी अविस्मरणीय स्वप्नपूर्ती आहे. मी खूप उत्साहित झाले आहे. अर्जुन पुरस्कार मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे. मला आणखी कठोर परिश्रम करावे लागतील, मला आणखी पुरस्कार मिळवून भारताचा गौरव करायचा आहे कारण ही माझ्या प्रवासची सुरवात आहे' असे मत पॅरा टेबल टेनिस खेळाडू आणि अर्जुन पुरस्कार विजेती भावना पटेलने व्यक्त केले.

दरम्यान गुजरातचे माजी क्रिकेटपटू, भारताच्या 19 वर्षांखालील संघातून खेळलेले निकुल पटेल हे भाविनाचे पती आहेत. भाविनाच्या उपस्थितीत ‘गोवा दिव्यांग हक्क संघटने’चा 18वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला होता. भाविनाचा 2016 साली रिओ पॅरालिंपिक स्पर्धेतील सहभाग थोडक्यात हुकला होता.

पॅरा टेबल टेनिस खेळाडू भाविनाला अर्जुन पुरस्कार
पेडणे तालुक्यात होणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान

कोण ही भाविना पटेल असा प्रश्न पूर्वी लोक विचारायचे, टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये रौप्यपदक जिंकले आणि जीवनच बदलून गेले. आता प्रत्येकजण मला ओळखतो. हे पदक खूप आनंद देणारे आहे, असे मत टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेतील महिला टेबल टेनिस एकेरीत उपविजेती ठरलेली भाविना पटेलने व्यक्त केले होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com