कम्युनिटी शिल्ड स्पर्धेत लिव्हरपूलला हरवून आर्सेनल विजेते

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑगस्ट 2020

पिएरे एमेरिक ऑबमेयांग याने मोक्‍याच्यावेळी केलेल्या गोलमुळे आर्सेनलने टायब्रेकरमध्ये ५-४ बाजी मारली

लंडन: आर्सेनलने प्रीमियर लीग विजेत्या लिव्हरपूलला हरवून कम्युनिटी शिल्ड फुटबॉल स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. पिएरे एमेरिक ऑबमेयांग याने मोक्‍याच्यावेळी केलेल्या गोलमुळे आर्सेनलने टायब्रेकरमध्ये ५-४ बाजी मारली. 

या कामगिरीमुळे आर्सेनल पिएरेबरोबरील करारास अंतिम स्वरूप देऊ शकेल. त्यानेच पूर्वार्धात संघास आघाडीवर नेले होते, पण जपानच्या ताकुमी मिनामिनो याने लिव्हरपूलला बरोबरी साधून दिली होती. प्रीमियर लीगचा विजेता आणि एफए लीगचा विजेता यांच्यात कम्युनिटी शिल्ड लढत होते. प्रीमियर लीगचा नवीन मोसम १२ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या