कॅप्टन्सीतील शतकी सिलसिला; कोहली स्मिथच्या मागे राहिला तो राहिलाच

कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून विराट कोहलीने (Virat Kohli) एकूण 20 शतके झळकावली असून या बाबतती तो दुसऱ्या स्थानावर आहे.
कॅप्टन्सीतील शतकी सिलसिला; कोहली स्मिथच्या मागे राहिला तो राहिलाच
Virat KohliDainik Gomantak

विराट कोहलीने भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद अचानक सोडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. विराट कोहलीने कसोटी कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केली. विराटच्या नेतृत्वाखाली आपल्या देशात आणि परदेशातही कसोटीत टीम इंडियाने (Team India) उत्तम कामगिरी केली. कर्णधार म्हणून विराट कोहलीनेही (Virat Kohli) कसोटी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर केले.

कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून कोहलीने 20 शतके झळकावली

कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून विराट कोहलीने एकूण 20 शतके झळकावली असून या बाबतती तो दुसऱ्या स्थानावर आहे. क्रिकेटच्या प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम ग्रॅमी स्मिथच्या (Graeme Smith) नावावर असून त्याने एकूण 25 शतके झळकावली आहेत. त्याचबरोबर विराट कोहली 20 शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Virat Kohli
विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदालाही ठोकला रामराम

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा कर्णधार

  • 25 - ग्रॅम स्मिथ

  • 20 - विराट कोहली

  • 19 - रिकी पाँटिंग

  • 15 - अॅलन बॉर्डर

  • 15 - स्टीव्ह स्मिथ

  • 15 - स्टीव्ह वा

कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत विराट आणि पाँटिंग समान पातळीवर आहेत.

दरम्यान, विराट कोहलीने कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 41 शतके झळकावली होती. त्याने आणखी एक शतक झळकावले असते तर त्याने या बाबतीत रिकी पाँटिंगला मागे टाकले असते. पाँटिंगने कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 41 शतके झळकावली आहेत. त्याचवेळी, या प्रकाराच ग्रॅम स्मिथ 33 शतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर स्टीव्ह स्मिथ 20 शतकांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा खेळाडू-

  • 41- रिकी पाँटिंग

  • 41- रिकी पाँटिंग

  • 33 - ग्रॅम स्मिथ

  • 20 - स्टीव्ह स्मिथ

  • 19 - मायकेल क्लार्क

  • 19 - ब्रायन लारा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com