ट्रेविस हेडची अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये वापसी

ट्रेविस हेड (Travis Head) टीममध्ये परतल्यानंतर मार्कस हॅरिसला बाहेर जावे लागले.
Twitter/@Cricket Australia
Twitter/@Cricket Australia Dainik Gomantak

ऑस्ट्रेलियाने (Australia) होबार्ट येथे शुक्रवारपासून इंग्लंडविरुद्ध पाचव्या आणि शेवटच्या ऍशेस कसोटीसाठी (Ashes Series) आपल्या संघात एक बदल केला आहे. या टीमने ट्रेव्हीस हेडचा (Travis Head) संघात समावेश केला आहे. हेड परतल्यानंतर मार्कस हॅरिसला बाहेर जावे लागले. कर्णधार पॅट कमिन्सने हेडच्या संघात समावेशाला दुजोरा दिला आहे.

ऑस्ट्रेलियाने (Australia) त्यांच्या बॉलींगबाबत अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही आणि वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँडच्या फिटनेस (Fitness) टेस्टनंतर गोलंदाज विभागात बदल होऊ शकतो, असे मानले जात आहे. इंग्लंडविरुद्ध (England) सुरू असलेल्या सामन्यांच्या ऍशेस कसोटीमध्ये 3-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा कसोटी सामना रोमांचक राहिला.

Twitter/@Cricket Australia
ISL football: ओडिशा एफसीवर दोन गोलने मात

ट्रेविस हेड सिडनीमध्ये खेळाल्या गेलेल्या चौथ्या कसोटीमद्धे खिळला नाही कारण तो कोरोनामुळे संघाबाहेर होता. परंतु पाचव्या कसोटीमध्ये पुनरागमन केळल्यानंतर तो उस्मान ख्वाजासोबत फलंदाजी करू शकतो. ख्वाजाने सिडनीमध्ये पहिल्या डावात 137 आणि दुसऱ्या डावत नाबाद 101 धावा केल्या. त्याचवेळी, हॅरिसने कसोटीतील पहिल्या चार सामन्यांमध्ये 30 पेक्षा कमी सरासरीने 179 धावा केल्या आहेत. हेड आल्यानंतर ख्वाजा ओपन करू शकतो तर हेड 5 क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. ख्वाजाच्या नावावर आतापर्यंत सलामीचा विक्रम आहे आणि त्याने 7 डावामध्ये 484 धावा केळल्या आहेत, त्यात दोन शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com