अशोक डिंडा गोव्याकडून खेळणार

क्रीडा प्रतिनिधी
रविवार, 27 सप्टेंबर 2020

भारताचा माजी आंतरराष्ट्रीय वेगवान गोलंदाज अशोक डिंडा आगामी मोसमात गोव्याचा पाहुणा (व्यावसायिक) क्रिकेटपटू असेल. 

पणजी: भारताचा माजी आंतरराष्ट्रीय वेगवान गोलंदाज अशोक डिंडा आगामी मोसमात गोव्याचा पाहुणा (व्यावसायिक) क्रिकेटपटू असेल. 

बंगालच्या या खेळाडूस रणजी संघात घेण्यासाठी गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) व्यवस्थापकीय समितीने मंजुरी दिली आहे.

अनुभवी डिंडा याच्या समावेशाने गोव्याची गोलंदाजी अधिक धारदार होण्याचे मानले जाते. 

याशिवाय मागील दोन मोसम गोव्याकडून खेळलेला कर्नाटकचा अष्टपैलू अमित वर्मा याला संघात कायम राखण्याचे जीसीएने ठरविले आहे. ही माहिती रविवारी संघटनेचे अध्यक्ष सूरज लोटलीकर यांनी आभासी पद्धतीने झालेल्या वार्षिक आमसभेनंतर दिली. डिंडाच्या निवडीची माहिती आमसभेस दिल्याचे लोटलीकर यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या