अश्विनचा विक्रम; मुथय्या मुरलीधरननंतर अशी खेळी करणारा ठरला दुसरा गोलंदाज  

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा डे नाईट सामना अहमदाबाद येथे खेळवण्यात आला. आणि या सामन्यावर टीम इंडियाने मजबूत पकड मिळवत विजय मिळवला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा डे नाईट सामना अहमदाबाद येथे खेळवण्यात आला. आणि या सामन्यावर टीम इंडियाने मजबूत पकड मिळवत विजय मिळवला आहे. भारतीय संघातील अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांच्या कामगिरीमुळे दुसऱ्या डावात पाहुण्या इंग्लंडचा संघ 81 धावांमध्ये आटोपला. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 49 धावांची गरज होती. त्यानंतर या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनने गोलंदाजी करताना दुसर्‍या डावात विशेष कामगिरी केली आहे. अश्विनने या सामन्यात कसोटी कारकिर्दीतील 400 वा बळी टिपला आहे. 

ISL2020-21: नॉर्थईस्टसाठी आणखी एक `फायनल` केरळा ब्लास्टर्सला नमविल्यास प्ले-ऑफ...

इंग्लंड विरुद्ध अहमदाबादच्या नवीन नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियम मध्ये खेळवण्यात येत असलेल्या डे सामन्यात फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने धमाकेदार कामगिरी केली आहे. त्याने या सामन्याच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना कसोटी कारकिर्दीतील आपली 400 वी विकेट मिळवण्याची कामगिरी केली आहे. शिवाय हा कारनामा करताना अश्विनने जगातील सर्वोत्तम अशा अनेक गोलंदाजांना मागे टाकले आहे. श्रीलंकेचा महान गोलंदाज मुथय्या मुरलीधरननंतर अश्विन हा वेगवान 400 कसोटी विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. आणि त्यासह अश्विनचा 400 कसोटी विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत समावेश झाला आहे. 

रविचंद्रन अश्विनने पहिल्या डावात गोलंदाजी करताना तीन विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावात देखील त्याने तिसरी विकेट घेताच अश्विनने 400 विकेट घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. व यासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये 600 विकेट घेण्याचा टप्पा देखील पूर्ण केला आहे. अश्विनने 77 व्या कसोटी सामन्यात 400 विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. आणि त्यामुळे भारताकडून सर्वात कमी डावात 400 बळी घेणारा अश्विन पहिला गोलंदाज बनला आहे. शिवाय या बाबतीत तो आंतराराष्ट्रीय क्रिकेट मध्ये दुसरा गोलंदाज ठरला आहे. कारण यापूर्वी मुथय्या मुरलीधरनने 72 सामन्यात 400 विकेट घेण्याचा विक्रम केला होता. तर न्यूझीलंडचे रिचर्ड हेडली यांनी 80 व्या कसोटी सामन्यात हा टप्पा गाठला होता. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने देखील 80 व्या सामन्यात 400 बळी मिळवले होते. आणि श्रीलंकेच्या रंगना हेरात यांनी 84 सामन्यात हा विक्रम केला होता.     

सर्वात कमी सामन्यात 400 विकेट घेणारे गोलंदाज - 
मुथय्या मुरलीधरन - 72 सामने 
अश्विन - 77 सामने 
रिचर्ड हेडली - 80 सामने 
डेल स्टेन - 80 सामने 
रंगना हेरात - 84 सामने 

याव्यतिरिक्त, कसोटी कारकिर्दीत 400 विकेट मिळवण्यासाठी अश्विनला  9 वर्ष 109 दिवस लागले. तर ऑस्ट्रेलिया संघाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅग्रा याबाबतीत अव्वल आहे. त्याने 8 वर्ष 341 दिवसात 400 वी विकेट घेतली होती. तेच मुथय्या मुरलीधरनला हा विक्रम आपल्या नावावर करण्यासाठी 9 वर्ष 137 दिवस लागले होते.  

संबंधित बातम्या