पाकिस्तानच्या पंतप्रधानांना अश्विनने आपल्या 'फिरकी'तूनच सुनावले खडे बोल  

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

इम्रान खान यांच्यावर जगभरातून टीका करण्यात येत आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशातील बलात्कार आणि लैंगिक हिंसाचाराच्या वाढीसाठी “फहाशी” पाश्चात्य संस्कृती जबाबदार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर इम्रान खान यांच्यावर जगभरातून टीका करण्यात येत आहे. इम्रान खान यांच्यावर टीका करणाऱ्यांच्यात आता भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचा देखील समावेश झाला आहे. इम्रान खान यांचे दोषारोप करणारे वक्तव्य अश्विनला पटलेले नाही. त्यामुळेच त्याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जोरदार टीका केली आहे. (Ashwin reacted strongly to the statement of Pakistans Prime Minister Imran Khan)

 IPL 2021 : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात पहिल्यांदाच दिसणार विशेष दृश्य

रविचंद्रन अश्विनने (R Ashwin) सोशल मीडियावरील ट्विटरवर इम्रान खान यांच्या विधानावर भाष्य करताना, चांगले पालकत्व करूया असे म्हटले आहे. याशिवाय अश्विनने पुढे आपल्या ट्विट मध्ये वर्तमान आपले भविष्य निश्चित करणार असल्याचे त्याने नमूद केले आहे. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या विधानावर जगभरातून टीका होत असतानाच आता रविचंद्रन अश्विनने देखील इम्रान खान यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलेच सुनावले आहे. 

IPL 2021: सिम्बाच्या गोलंदाजीवर राहणेची फटकेबाजी

दरम्यान, इम्रान खान (Imran Khan) यांनी गेल्या आठवड्यामध्ये पाकिस्तानी वाहिनीवरच्या शोमध्ये महिलांवरील अत्याचाराविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, महिलांवरील वाढते अत्याचार हे पाश्चात्य देशांकडून आलेल्या अश्लिलतेचा परिणाम असल्याचे म्हटले होते. तसेच मुस्लिस धर्मामध्ये शरीर झाकण्याची पध्दत असल्याची पुस्ती देखील इम्रान खान यांनी यावेळी पुढे जोडली होती. क्रिकेटर आणि पुढे राजकारणात गेलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या या विधानानंतर त्यांच्यावर सर्व बाजुंनी टीका करण्यात येत आहे.        

संबंधित बातम्या