Asia Cup 2022 Schedule: आशिया चषकमध्ये भारत-पाक आमने-सामने, वेळापत्रक जाहीर

Asia Cup 2022 Schedule: 27 ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून अंतिम सामना 11 सप्टेंबरला होणार आहे.
India Pakistan Match
India Pakistan MatchDainik Gomantak

Asia Cup 2022 Updates: प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, आशिया कपचे संपूर्ण वेळापत्रक समोर आले आहे. 27 ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून अंतिम सामना 11 सप्टेंबरला होणार आहे. येथे भारत-पाकिस्तान (IND vs PAK) एकाच गटात आहेत आणि ते 28 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता मैदानावर उतरणार आहेत. आशिया कपचे आयोजन संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये होत आहे. आशिया कपमध्ये दोन गट करण्यात आले आहेत. प्रत्येक गटात तीन संघ असतील. अ गटात भारत-पाकिस्तानसह आणखी एक पात्रता संघ असेल. तसेच अफगाणिस्तानचा संघ श्रीलंका आणि बांगलादेशसह ब गटात ठेवण्यात आला आहे.

India Pakistan Match
SA vs IRE: दक्षिण आफ्रिका संघाला मोठा झटका, कागिसो रबाडा टी-20 मालिकेतून आउट

वेळापत्रकानुसार भारत 28 ऑगस्टपासून पाकिस्तानविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. यानंतर भारताचा दुसरा सामना 31 ऑगस्टला होणार आहे. यानंतर 3 सप्टेंबरपासून सुपर-4 फेरीत 6 सामने खेळवले जातील. 11 सप्टेंबर रोजी अव्वल दोन संघ अंतिम फेरीत भिडतील.

India Pakistan Match
Durand Cup football Tournament : ड्युरंड कप पुन्हा गोव्यात!

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून आशिया कपचे वेळापत्रक शेअर केले. त्यांनी लिहिले की, 'प्रतीक्षा अखेर संपली कारण आशियाई वर्चस्वाची स्पर्धा 27 ऑगस्टपासून सुरू होत आहे. अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी होणार आहे. आशिया चषक स्पर्धेची ही 15 वी आवृत्ती टी-20 विश्वचषकापूर्वी महत्त्वाची तयारी म्हणून कामगिरी बजावणार आहे. 2022 मध्ये पहिला आशिया कप श्रीलंकेत होणार होता. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून तेथे सुरू असलेल्या अस्थिरतेमुळे ते यूएईला हलवण्यात आले आहे. असे असले तरी सामन्यांच्या तारखेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com