Asia Cup 2022 चे जेतेपद श्रीलंकेच्या 'या' चॅम्पियनने देशाला केले समर्पित

Asia Cup 2022: विजेतेपदाच्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव करत आशिया चषक विजेतेपद पटकावले.
Sri Lanka Team
Sri Lanka Team Dainik Gomantak

Asia Cup 2022: आशिया चषक स्पर्धेत श्रीलंकेच्या विजेतेपदाचा नायक भानुका राजपक्षे याने संकटाचा सामना करणाऱ्या आपल्या देशाला हे जेतेपद समर्पित केले आहे. रविवारी रात्री झालेल्या विजेतेपदाच्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव करत आशिया चषक विजेतेपद पटकावले, 2014 नंतरचे त्यांचे एकूण सहावे विजेतेपद आहे.

श्रीलंकेने जेतेपद पटकावले

प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 58 धावांत पाच विकेट गमावल्या होत्या, परंतु राजपक्षे (45 चेंडूत 71 धावा) आणि वानिंदू हसरंगा (21 चेंडूत 36 धावा) यांच्या धडाकेबाज खेळीने संघाला 6 बाद 170 धावांपर्यंत मजल मारता आली.

चॅम्पियन बनल्यानंतर संघाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले

"काही दशकांपूर्वी, आम्हाला जगाला दाखवून द्यायचे होते की, आमचा संघही आक्रमकरित्या पुढे येऊ शकतो. आम्हाला ते क्षण एक संघ जगायचे आहेत," असे राजपक्षेने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले.

श्रीलंकेच्या संघाने आशिया कपचे विजेतेपद देशाला समर्पित केले

राजपक्षे पुढे म्हणाला, 'पुढे जाऊन आम्हाला विश्वचषकापूर्वी ही गती कायम ठेवायची आहे. देशाची आर्थिक स्थिती पाहता श्रीलंकेतील सर्व लोकांसाठी हा कठीण काळ आहे. परंतु आम्हाला आशा आहे की, आम्ही आमच्या लोकांच्या चेहऱ्यावर काहीसं हसू आणू शकलो.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com