Mohammed Siraj: भारताच्या मियाँ मॅजिकसमोर श्रीलंका ढेर! 6 विकेट्स घेत केले तब्बल 8 मोठे रेकॉर्ड्स
Asia Cup 2023 Final India vs Sri Lanka Mohammed Siraj :
रविवारी (17 सप्टेंबर) आशिया चषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध श्रीलंका संघात पार पडला. या सामन्यात भारताने 10 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. भारताच्या या विजयात मोहम्मद सिराजने मोलाचे योगदान उचलले.
सिराजने या सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक गोलंदाजी करताना 7 षटकात 21 धावा देत 6 विकेट्स घेतल्या, यातील 4 विकेट्स त्याने डावातील चौथ्याच षटकात घेतल्या.
त्याने चौथ्या षटकात पाथम निसंकाला (2), सदिरा समरविक्रमाला (0), चरिथ असलंकाला (0) आणि धनंजय डी सिल्वाला (4) बाद केले. त्यानंतर त्याने श्रीलंकेचा कर्णधार दसून शनका (0) आणि कुशल मेंडिस (17) यांनाही माघारी धाडले.
सिराजने पहिल्या 5 विकेट्स तर 16 चेंडू टाकतच पूर्ण केल्या होत्या. या सामन्यादरम्यान सिराजने त्याच्या वनडे कारकिर्दीत 29 सामन्यांत 50 विकेट्सचा टप्पाही पार केला आहे. त्यामुळे त्याने अनेक विक्रम नावावर केले आहेत. त्याने केलेल्या विक्रमांकावर एक नजर टाकू.
वनडेत एकाच षटकात 4 विकेट्स घेणारा मोहम्मद सिराज पहिलाच आणि सध्यातरी एकमेव गोलंदाज
श्रीलंकेविरुद्ध वनडेत सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन
21 धावांत 6 विकेट्स - मोहम्मद सिराज, कोलंबो, 2023
26 धावांत 6 विकेट्स - वकार युनूस, शारजाह, 1990
भारतासाठी वनडेत सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन
4 धावांत 6 विकेट्स - स्टुअर्ट बिन्नी, (विरुद्ध बांगलादेश, मिरपूर, 2014)
12 धावांत 6 विकेट्स - अनिल कुंबळे, (विरुद्ध वेस्ट इंडिज, कोलकाता, 1993)
19 धावांत 6 विकेट्स - जसप्रीत बुमराह (विरुद्ध इंग्लंड, द ओव्हल, 2022)
21 धावांत 6 विकेट्स - मोहम्मद सिराज (विरुद्ध श्रीलंका, कोलंबो, 2023)
23 धावांत 6 विकेट्स - आशिष नेहरा (विरुद्ध इंग्लंड, डर्बन, 2003)
आशिया चषकात एकाच वनडे डावात सहा विकेट्स घेणारे गोलंदाज
13 धावांत 6 विकेट्स - अजंता मेंडिस (विरुद्ध भारत, कराची, 2008)
21 धावांत 6 विकेट्स - मोहम्मद सिराज (विरुद्ध श्रीलंका, कोलंबो, 2023)
चेंडूंच्या तुलनेत सर्वात जलद 50 वनडे विकेट्स घेणारे गोलंदाज
847 चेंडू - अजंता मेंडिस
1002 चेंडू - मोहम्मद सिराज
वनडेत सर्वात कमी सामन्यात 50 विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज
23 सामने - अजित अगरकर
24 सामने- कुलदीप यादव
28 सामने - जसप्रीत बुमराह
29 सामने - मोहम्मद सिराज
29 सामने - मोहम्मद शमी
वनडे डावात सर्वात जलद 5 विकेट्स पूर्ण करणारे गोलंदाज
16 चेंडू - चामिंडा वास, (श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, 2003)
16 चेंडू - मोहम्मद सिराज (भारत विरुद्ध श्रीलंका, 2023)
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.