बॉक्सर दिनको सिंह मेरी कोम आणि एल सरिता देवीचे होते प्रेरणास्थान

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 10 जून 2021

एशियन गेम्समधले(Asian Games) सुवर्णपदक विजेते(Gold Medallist) बॉक्सर दिनको सिंह(Boxer Dingko Singh) यांचे निधन झाले आहे. ते 42 वर्षाचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते.

एशियन गेम्समधले(Asian Games) सुवर्णपदक विजेते(Gold Medallist) बॉक्सर दिनको सिंह(Boxer Dingko Singh) यांचे निधन झाले आहे. ते 42 वर्षाचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. यकृताच्या कर्करोगाने ते ग्रस्त असल्याने त्यांच्यावर 2017 पासून उपचार सुरू होते. मागच्या वर्षी त्यांना करोनाची लागणही झाली होती, पण त्यांनी या आजारावर मात केली होती. काही दिवसांपासून सिंग यांच्यावर आयएलबीएस मध्ये, दिल्ली येथे उपचार सुरू होते. 

Indian Super League: आयएसएल मैदानावर भारतीय फुटबॉलपटूत वाढ

त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मागच्या वर्षी मणिपूरहून विमानाने दिल्ली ला आणण्यात आले होते. मात्र तेव्हा त्यांना कावीळ झाल्यामुळे त्यांच्यावर कर्करोगावरील उपचार करता आले नाहीत. आणि म्हणून त्यांना पुन्हा रुग्णवाहिकेतून 2400 किमी लांब असलेल्या मणिपूरला परत नेण्यात आले. 1998 मध्ये बँकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दिनको सिंह यांनी सुवर्णपदक जिंकले. 1998 मध्ये त्यांना अर्जुन आणि 2013 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सहा वेळा विश्वविजेता  एम.सी. मेरी कोम आणि एल सरिता देवी यांचे  प्रेरणास्थान असलेल्या दिनको सिंग यांनी भारतीय नौदलातही सेवा दिली आणि प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे, परंतु आजारपणामुळे त्यांना घरीच राहावे लागले.

विश्वचषकाच्या तब्बल 15 महिन्यानंतर महिला संघाला मिळाली बक्षीसाची रक्कम

 

देशाचे क्रीडामंत्री किरन रिजिजू(Kiren Rijiju) यांनी दिनको सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. रिजीजूंनी आपल्या ट्वीटमध्ये, ”दिनको सिंह यांच्या निधनामुळे अतिशय वाईट वाटत आहे. ते भारताचे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट बॉक्सिंगपटूंपैकी एक होते. 1998 बँकॉक आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक मिळवल्यामुळे भारतात बॉक्सिंग चेन रिअॅक्शन निर्माण झाली. मी त्यांच्या कुटुंबासाठी शोक व्यक्त करतो.” असे लिहिले आहे.

संबंधित बातम्या