के. एल राहुलला अतियाने दिल्या शुभेच्छा; सुनील शेट्टीने दिली प्रतिक्रिया

दैनिक गोमंतक
रविवार, 18 एप्रिल 2021

बॉलीवुड स्टार अथिया शेट्टीने  क्रिकेटर के. एल राहुलच्या वाढदिवसानिम्मित  सोशल मीडिया वर दोन मजेदार फोटो शेअर केले आहेत.

HAPPY  BIRTHDAY: बॉलीवुड स्टार अथिया शेट्टीने  क्रिकेटर के. एल राहुलच्या वाढदिवसानिम्मित  सोशल मीडिया वर दोन मजेदार फोटो शेअर केले आहेत. अथिया शेट्टीने फोटोला सुंदर कॅप्शन दिले आहे.  राहुलसाठी एक सुंदर मॅसेज देखील कॅप्शनमध्ये लिहिलेले आहे. हे फोटोस  इंटरनेटवर व्हायरल होत आहे. 'तुझी आभारी आहे .. हैप्पी बर्थडे' असे कॅप्शन दिले आहे. अथिया शेट्टीच्या या फोटोवर पिता सुनील शेट्टीनेही प्रतिक्रिया दिली आहे. अथिया आणि केल राहुल दोघेही वाढदिसानिम्मित सोशिअल मीडियावरती फोटो टाकत असतात. दोघांच्या दोस्तीविषयी त्यांचे चाहते चर्चा करत असतात. (Athiya's best wishes to Kl Rahul Sunil Shetty's response)

या वेळी केएल राहुल आयपीएलमध्ये व्यस्त आहेत. आयपीएलमध्ये  (आयपीएल 2021) राहुल पंजाब किंग्जच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. आतापर्यंत  पंजाब किंग्ज  2 सामने खेळले असून एक सामना जिंकला आहे तर एका सामन्यात हार पत्करावी लागली आहे. सीएसके विरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जचा वाईट पराभव झाला. पंजाब किंग्जच्या पहिल्या सामन्यात केएल राहुलने 91 धावांची खेळी साकारली होती, तर दुसर्‍या सामन्यात जडेजाने राहुलला धावबाद केले होते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण सामन्यात शतक ठोकणारा केएल राहुल एकमेव भारतीय फलंदाज आहे. आतापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत राहुलने 12 शतके आणि 32 अर्धशतके झळकावले आहेत. केएल राहुलच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5072 धावा आहेत.

संबंधित बातम्या