एटीके मोहन बागान 'आयएसएल'मध्ये विजयी हॅटट्रिकसाठी प्रयत्नशील

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

एटीके मोहन बागानने (एटीकेएमबी) इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉलच्या सातव्या मोसमातील मोहिमेची दमदार सुरवात करताना दोन्ही सामने जिंकले, आता कोलकात्यातील मातब्बर संघ आज विजयी हॅटट्रिकसाठी प्रयत्नशील असेल.

पणजी :  एटीके मोहन बागानने (एटीकेएमबी) इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉलच्या सातव्या मोसमातील मोहिमेची दमदार सुरवात करताना दोन्ही सामने जिंकले, आता कोलकात्यातील मातब्बर संघ आज विजयी हॅटट्रिकसाठी प्रयत्नशील असेल.फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर एटीके मोहन बागानसमोर ओडिशा एफसीचे आव्हान असेल. ओडिशा संघाला अजूनही विजय गवसलेला नाही, फक्त एका गुणासह ते दहाव्या स्थानी आहेत. एकंदरीत कामगिरी पाहता, एटीके मोहन बागानला गुरुवारी विजयाच्या पूर्ण तीन गुणांची संधी राहील. 

ओडिशा एफसीने मागील लढतीत जमशेदपूरचा एक खेळाडू कमी झाल्यानंतर दिएगो मॉरिसियो याने दोन गोल नोंदविल्यामुळे बरोबरी साधली होती, पण स्टुअर्ट बॅक्स्टर यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला अजून सूर गवसलेला नाही.

 

अधिक वाचा :

एफसी गोवाच्या रेडीमवर कडक कारवाई ;  आणखी एका आयएसएल सामन्यासाठी निलंबित

ऑस्ट्रेलियात `भोळें`कडे केला विराटने ब्रेकफास्ट 

संबंधित बातम्या