आयएसएल : एटीके मोहन बागानच्या आक्रमणाची कसोटी

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 20 जानेवारी 2021

एटीके मोहन बागानने सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत आतापर्यंत अकरा गोल नोंदविले आहेत, तर मागील चार लढतीत त्यांना तीनच गोल करणे शक्य झाले. साहजिकच चेन्नईयीन एफसीविरुद्ध परतीच्या लढतीत कोलकात्यातील संघाच्या आक्रमणाचा कस लागणार आहे.

पणजी : एटीके मोहन बागानने सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत आतापर्यंत अकरा गोल नोंदविले आहेत, तर मागील चार लढतीत त्यांना तीनच गोल करणे शक्य झाले. साहजिकच चेन्नईयीन एफसीविरुद्ध परतीच्या लढतीत कोलकात्यातील संघाच्या आक्रमणाचा कस लागणार आहे.

सामना गुरुवारी (ता. 21) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात चेन्नईयीनने एटीके मोहन बागानला गोलशून्य बरोबरीत रोखले होते. चार सामन्यांतून एक विजय, दोन बरोबरी व एका पराभवासह पाच गुणांची करणाऱ्या एटीके मोहन बागानवर अव्वल स्थानावरील मुंबई सिटीचे मोठी आघाडी घेतली आहे. मुंबईच्या संघाचे 26 गुण असून दुसऱ्या क्रमांकावरील एटीके मोहन बागानचे 21 गुण आहेत. गुरुवारी चेन्नईयीनला नमविल्यास त्यांना गुणांची तफावत कमी करता येईल.

आपल्या संघावर दबाव नसल्याचे प्रशिक्षक हबास यांचे म्हणणे आहे. एटीके मोहन बागानला मागील दोन लढतीत मुंबई सिटीकडून पराभव पत्करावा लागला, तर एफसी गोवाविरुद्ध बरोबरीच्या एका गुणावर समाधान मानावे लागले. त्यांचा हुकमी आघाडीपटू रॉय कृष्णा याने मागील पाच लढतीत फक्त एकच गोल नोंदविला आहे.

साबा लाझ्लो यांच्या मार्गदर्शनाखालील चेन्नईयीन एफसीच्या आक्रमणातही सातत्य नाही. त्यांनी 12 लढतीत सर्वांत कमी 10 गोल नोंदविले आहेत. पाच लढतीत त्यांना गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले आहे. सध्या त्यांचे 15 गुण आहेत. दोन बरोबरी व एका विजयामुळे मागील तीन सामने अपराजित असलेल्या चेन्नईयीनने गुरुवारी धक्कादायक विजय नोंदविल्यास पहिल्या चार संघांत स्थान मिळविण्यासाठी आव्हान राखता येईल. मागील लढतीत ईस्ट बंगालने पूर्वार्धात एक खेळाडू कमी होऊनही चेन्नईयीनला गोलशून्य बरोबरीत रोखले होते.

 

दृष्टिक्षेपात...

- एटीके मोहन बागानचे 6 विजय, 3 बरोबरी, 2 पराभव

- चेन्नईयीनचे 3 विजय, 6 बरोबरी, 3 पराभव

- एटीके मोहन बागानच्या 7, तर चेन्नईयीनच्या 5 क्लीन शीट्स

- पहिल्या टप्प्यात बांबोळी येथील 0 - 0 बरोबरी

- एटीके मोहन बागानने फक्त 5 गोल स्वीकारलेत, चेन्नईयीनवर 12 गोल

- एटीके मोहन बागानच्या रॉय कृष्णाचे 6 गोल
 

संबंधित बातम्या