लिलावाची तारीख ठरली! पुणे फ्रँचायझीचे जुने मालकही उतरणार लिलावात

बीसीसीआयने (BCCI) 17 ऑक्टोबर रोजी इंडियन प्रिमिअर लीगच्या (Indian Premier League) दोन नव्या संघाचा लिलाव आयोजित करण्यात येऊ शकतो असे सांगण्यात येत आहे.
लिलावाची तारीख ठरली! पुणे फ्रँचायझीचे जुने मालकही उतरणार लिलावात
Indian Premier LeagueDainik Gomantak

बीसीसीआयने (BCCI) 17 ऑक्टोबर रोजी इंडियन प्रिमिअर लीगच्या (Indian Premier League) दोन नव्या संघाचा लिलाव आयोजित करण्यात येऊ शकतो असे सांगण्यात येत आहे. हा लिलाव मस्कत (Muscat) किंवा दुबईमध्ये (Dubai) आयोजित केला जाऊ शकतो. या लिलावासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 21 सप्टेंबर, 5 ऑक्टोबर आणि 17 ऑक्टोबर या तीन प्रमुख तारखा निवडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 21 सप्टेंबरपर्यंत यावर अंतिम निर्णय घेण्यात येऊ शकतो, असही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, बीसीसीआय या लिलावासाठीचे आमंत्रक पत्रक 5 ऑक्टोबरपर्यंत खरेदीसाठी उपलब्ध करुन देणार आहे. शिवाय 17 ऑक्टोबरलाही लिलाव होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे हा ई-लिलाव होणार नसल्याची खात्रीही झाली आहे. त्याचबरोबर काही एजन्सींसह मोठ्या कंपन्यांनी लिलावाच्या आमंत्रणाची कागदपत्रे खरेदी केल्याचे मानले जात आहे. त्यापैकी एक आरपीएसजी समूहाचे संजीव गोएंका (Sanjeev Goenka) आहेत जे यापूर्वी पुणे फॅंचायझीचे (Pune franchise) मालक होते. यावेळी लखनऊ संघ खरेदी करु शकतात असाही कयास लावला जात आहे.

Indian Premier League
बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय; आयपीएलचे पुढील सामने रद्द

शिवाय, आयपीएल 2022 पासून प्रत्येक हंगामामध्ये साखळी सामन्यांची संख्या आता 18 होणार आहे. त्यापैकी नऊ सामने भारतात आणि नऊ सामने बाहेरच्या मैदानावर खेळविण्यात येणार आहेत. सध्या आठ संघांचा समावेश लीगमध्ये आहे. त्यापैकी त्यांचे सात सामने घरच्या मैदानावर आणि सात सात सामने बाहेरच्या मैदानावर खेळविण्यात येतील असही यावेळी सांगण्यात आले आहे.

तसेच, बीसीसीआयने आर्थिक निकषांबाबत स्पष्ट केले आहे की, प्रत्येक लिलाव लावणाऱ्या मालकाची सरासरी किंमत 2500 कोटी रुपये असावी त्याचबरोबर त्याची आर्थिक उलाढाल 3000 कोटीपर्यंत असणे आवश्यक आहे. संघ खरेदी करण्याबाबत केवळ तीन भागीदारांना यासंबंधी परवानगी देईल. तसेच त्यापैकी एकाला 2500 कोटींची निव्वळ किंमत आणि 2000 कोटी रुपयांची उलाढाल असण्याचे निकष पूर्ण करावे लागणार आहेत. बीसीआय मात्र सध्याच्या संघाना आपले खेळाडू कायम ठेवण्याच्या शक्यतेवर अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com