
Pat Cummins: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा कर्णधार पॅट कमिन्सवर गुरुवारी रात्री दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याला मातृशोक झाला आहे. त्याची आई मारिया कमिन्स यांचे दीर्घ आजारानंतर निधन झाले आहे. याबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाने माहिती दिली आहे.
समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार मारिया या गेल्या काही काळापासून ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत होत्या. त्यांची तब्येतही गेल्या काही दिवसात खालावली होती. अखेरच त्यांची गुरुवारी रात्री दीर्घ आजाराशी लढाई संपली आहे.
त्यांच्या निधनाबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही शोक व्यक्त केला आहे. तसेच सध्या अहमदाबादला सुरू असलेल्या भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूंनी शोक व्यक्त करण्यासाठी दंडाला काळी पट्टी बांधली आहे.
दरम्यान, भारताविरुद्धचा दुसरा कसोटी सामना 19 फेब्रुवारीला संपल्यानंतर लगेचच पॅट कमिन्स मायदेशी परतला होता. त्यावेळी मारिया यांची तब्येत खालावली होती. त्याचमुळे कमिन्स भारताविरुद्ध तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्याला मुकला आहे. या काळात त्याने कुटुंबाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या या निर्णयाला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पाठिंबा दिला होता.
कमिन्सच्या अनुपस्थितीत या दोन्ही कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते. यावेळी स्मिथने कमिन्सला त्याच्या कठीण काळात संघाची साथ असल्याचे स्पष्ट केले होते.
दरम्यान या कसोटी मालिकेनंतर भारताविरुद्ध १७ मार्चपासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेसाठी कमिन्स ऑस्ट्रेलियन संघात परतण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात १७ ते २२ मार्चदरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे.
29 वर्षीय कमिन्सने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये 49 कसोटी सामन्यांमध्ये 21.50 च्या सरासरीने 217 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच तो कसोटी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
त्याने वनडे क्रिकेटमध्ये 75 सामने खेळले असून 27.61 च्या सरासरीने 124 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 50 सामने खेळले असून 55 विकेट्स घेतल्या आहेत. याबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 हून अधिक धावाही केल्या आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.