ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन यांनी कोणाला म्हटले भारतीय संघाचा पुढचा धोनी?

गोमंतक ऑनलाईन टीम
सोमवार, 7 डिसेंबर 2020

सामना संपल्यावर ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी भारतीय संघातील फलंदाजांचे कौतूक केले.

कॅनबेरा- ऑस्ट्रेलियाविरूद्ध हार्दिक पांड्याने मॅच विनिंग खेळी करून भारताला मालिका विजय साकारण्यात महत्वाचा वाटा उचलला. त्याची ही सामना फिरवण्याची ताकद बघून त्याला भारतीय संघाचा धोनी म्हटले जात आहे. ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगरही त्याच्या या खेळीने प्रभावित झाले असून पांड्यामध्ये धोनी दिसत असल्याचे मोठे विधान केले आहे. हार्दिक पांड्याने २२ चेंडूंमध्य़े ४२ धावा करून संघाला अशक्य वाटत असलेला विजय अक्षरश: खेचून आणला होता. 

सामना संपल्यावर ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी पत्रकार परिषद  म्हटले की,'पांड्याची खेळी कालच्या खेळातील बघावी अशी खेळी होती. आम्हाला माहिती आहे की, तो किती खतरनाक खेळतो . याआधी आम्ही धोनीला असे करताना बघितले आहे आणि आज पांड्याने तशीच खेळी साकारली. पांड्याने संपूर्ण मोसमातच अप्रतिम खेळी केल्या असून अखेरीसही त्याने अशाच प्रकारचे प्रदर्शन केले. 

याबरोबरच लँगर यांनी भारत टी२० मध्ये ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत अधिक अनुभवी संघ म्हणून खेळतो आहे. त्यांनी पुढे बोलताना म्हटले की, 'मला वाटतं की सामना अतिशय अतितटीचा होता. आमचे क्षेत्ररक्षण अतिशय चपळ होते. मात्र, भारताने आपल्या अनुभवी खेळाडूंना सोबत घेऊन आमच्याविरूद्ध जे प्रदर्शन केले ते आमच्या संघावर भारी पडले.'

 विराट कोहलीबाबत काय म्हटले लँगर?

 हार्दिक पांड्या व्यतिरिक्त त्यांनी विराट कोहलीचेही कौतूक केले. विराटने या सामन्यात २४ चेंडूंमध्ये ४० धावा केल्या. याबाबत बोलताना ते म्हणाले, 'विराटचे काही शॉट पाहण्यासारखे होते. मागील काही वर्षांपासून मी जेवढे खेळाडू बघितलेत त्यांमध्ये विराट सर्वांत चांगला खेळाडू आहे. त्याने महत्वाची भागीदारी करून संघाला विजयापर्यंतर आणून सोडले.  
 

 

संबंधित बातम्या