जगातील 5 दिग्गज टी-20 खेळाडूंची Adam Gilchrist ने केली निवड, 'सूर्या' कडे दुर्लक्ष

Top 5 T20 Players: ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज अ‍ॅडम गिलख्रिस्टने जगातील 5 महान टी-20 खेळाडूंची निवड केली आहे.
Adam Gilchrist
Adam GilchristDainik Gomantak

Adam Gilchrist: ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज अ‍ॅडम गिलख्रिस्टने जगातील 5 महान टी-20 खेळाडूंची निवड केली आहे. अ‍ॅडम गिलख्रिस्टने या यादीत केवळ एका भारतीय खेळाडूची निवड केली आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अ‍ॅडमने सूर्यकुमार यादवसारख्या विस्फोटक भारतीय खेळाडूची निवड केली नाही. तर टीम इंडियाचा एक दिग्गज खेळाडू निवडला आहे.

दरम्यान, अ‍ॅडम गिलख्रिस्टने (Adam Gilchrist) निवडलेल्या 5 महान टी-20 खेळाडूंमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam), इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर, अफगाणिस्तानचा लेग-स्पिनर रशीद खान, ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि एक भारतीय खेळाडू यांचा समावेश आहे.

अ‍ॅडम गिलख्रिस्टने या भारतीयाला जागा दिली, सूर्यकुमारला नाही

अ‍ॅडम गिलख्रिस्टने भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याची निवड केली आहे, परंतु त्याने करिष्माई फलंदाज सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) स्थान दिले नाही. ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून सुरु होत असलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषकासह, गिलख्रिस्टने सूर्यकुमारचे नाव न घेता हार्दिक पांड्याला 'धोकादायक' खेळाडू म्हटले आहे. रविवारी गुवाहाटी येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेत सूर्यकुमारने पुन्हा भारतीय संघात महत्त्वाची भूमिका बजावली.

गिलख्रिस्टने धक्कादायक कारण दिले

सूर्यकुमारने 22 चेंडूत 61 धावांची शानदार खेळी केल्यामुळे भारताला 237/3 अशी मोठी धावसंख्या उभारता आली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला 16 धावांनी विजयासाठी 221/3 पर्यंत रोखले. तथापि, गिलख्रिस्ट म्हणाला की, 'मी हार्दिक पांड्याच्या फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि त्याच्या क्षमतेसोबत जाईन. हार्दिक पांड्या सध्या अष्टपैलू खेळाडूंच्या ICC T20 क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे.'

आक्रमकता

आयसीसीने गिलख्रिस्टला उद्धृत केले की, 'हार्दिक पांड्या (Hardik Pandya) एक शानदार खेळाडू आहे. त्याची फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि क्षमता नक्कीच वाखणण्याजोगी आहे. गिलख्रिस्ट पुढे म्हणाला, 'ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. मला वाटते की, त्याची आक्रमकता, तो टॉप ऑर्डरमध्ये ज्या पद्धतीने डावाची सुरुवात करतो हे पाहून थक्क व्हायला होतं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com