कसोटी मालिका जिंकण्याची संधी ऑस्ट्रेलियाला जास्त

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

संपूर्ण क्रिकेट विश्‍वाचे लक्ष असलेली ऑस्ट्रेलिया-भारत यांच्यातील आगामी कसोटी मालिका जिंकण्याची अधिक संधी ऑस्ट्रेलियाला असेल, असा अंदाज पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वसिम अक्रमने व्यक्त केला आहे.

कराची :  संपूर्ण क्रिकेट विश्‍वाचे लक्ष असलेली ऑस्ट्रेलिया-भारत यांच्यातील आगामी कसोटी मालिका जिंकण्याची अधिक संधी ऑस्ट्रेलियाला असेल, असा अंदाज पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वसिम अक्रमने व्यक्त केला आहे. डिसेंबर-जानेवारी महिन्यात चार सामन्यांची ही मालिका ऑस्ट्रेलियात होत आहे.
माझ्या मते, ऑस्ट्रेलियाकडे सध्या सर्वोत्तम वेगवान मारा आहे. त्यांच्याकडे पॅट कमिंस, मिशेल स्टार्क, जोश हॅझलवूड असे विश्‍वविख्यात गोलंदाज आहेत. ही मालिका चुरशीची होईल, परंतु ऑस्ट्रेलियाला विजयाची संधी अधिक असेल, असे अक्रमने म्हटले आहे. भारताकडेही तेवढ्याच ताकदीचा वेगवान मारा आहे. जसप्रित बुमरा, शमी, नवदीप सैनी ते सुद्धा तोडीस तोड वेगवान गोलंदाज आहेत, असे अक्रम म्हणतो.

संबंधित बातम्या