दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताला ३९० धावांचे आव्हान

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

आजच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सुरूवातीपासूनच आक्रमक खेळ करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने ५० षटकांमध्ये ३८९ धावा करत, भारताला ३९० धावांचे आव्हान दिले आहे.

सिडनी : आजच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सुरूवातीपासूनच आक्रमक खेळ करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने ५० षटकांमध्ये ३८९ धावा करत, भारताला ३९० धावांचे आव्हान दिले आहे. शेवटच्या षटकात नवदिप सैनाच्या गोलंदाजीवर २ षटकार ठोकत मॅक्सवेलने २३ चेंडूत ६९ धावा केल्या. त्याआधी स्टिव्ह स्मिथने ६४ चेंडूत आपले शतक साजरे केले.

शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला असला तरी सिडनीचे मैदान गेल्याच वर्षी भारतीयांसाठी फलदायी ठरले होते. जानेवारी २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने पिछाडीवरून याच मैदानावर मालिका २-१ अशी जिंकली होती. त्या वेळी डेव्हिड वॉर्नर, स्टीव स्मिथ यांच्यावर बंदीच होती. पॅट कमिंस, मिशेल स्टार्क आणि जोश हॅझलवूड या वेगवान त्रयीपैकी कोणीच संघात नव्हते. आता मात्र ऑस्ट्रेलिया या पाचही जणांसह खेळत आहे.

अधिक वाचा :

 

मायकेल वॉन म्हणतोय भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध तिन्ही मालिका हरणार.. 

एफसी गोवाच्या रेडीमला कारणे दाखवा नोटीस

संबंधित बातम्या