AUSvsIND 4Th Test 1 Day: पहिल्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत स्थितीत 

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील तिसरा सामना सिडनीच्या एमसीजी मैदानावर खेळवण्यात आला होता. व या सामन्याचा निकाल अनिर्णित राहिला होता.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील तिसरा सामना सिडनीच्या एमसीजी मैदानावर खेळवण्यात आला होता. व या सामन्याचा निकाल अनिर्णित राहिला होता. तर पहिला सामना ऑस्ट्रेलियाने आणि दुसरा सामना टीम इंडियाने जिंकला होता. त्यामुळे ब्रिस्बेन येथे होत असलेला तिसरा कसोटी सामना हा दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण राहणार आहे. आज पासून सुरु झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार टीम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. व पहिल्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत कांगारूंनी पाच गडी गमावत 274 धावा केलेल्या आहेत. 

ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला मोहम्मद सिराजने अवघ्या एक धावांवर माघारी पाठवले. त्यामुळे वॉर्नर चौथ्या सामन्यात पुन्हा एकदा अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. यानंतर मार्कस हॅरिस देखील स्वस्तात बाद झाला. त्याला फक्त पाच धावांवर शार्दूल ठाकूरने वॉशिंग्टन सुंदर करवी झेलबाद केले. त्यामुळे चौथ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाची सुरवात अडखळत झाल्याचे प[पाहायला मिळाले. मात्र त्यानंतर लबूशेन आणि स्मिथ यांनी संघाचा डोलारा सावरताना  50 हून अधिक धावांची भागीदारी केली.

लबूशेन आणि स्मिथ यांच्यातील भागीदारी वाढत असतानाच स्मिथला वॉशिंग्टन सुंदरने रोहित शर्माकरवी झेलबाद केले. तिसऱ्या सामन्यात शतक लागवणारा स्मिथ पहिल्या डावात 36 धावांवर बाद झाला. स्मिथ गेल्यानंतर मागील काही डावांपासून घातक ठरत असलेल्या लबूशेनने पहिल्या डावात देखील मैदानावर जम बसवत शतकी खेळी केली. त्याने 195 चेंडूंचा सामना करताना भारताविरुद्धचे आपले पहिले शतक झळकावले. तर दुसऱ्या बाजूला असलेल्या मॅथ्यू वेड बाद झाल्यामुळे कांगारूंना चौथा झटका लागला. मॅथ्यू वेडला टी नटराजनने शार्दूल ठाकूरकडे झेलबाद केले. मॅथ्यू वेड अर्धशतक करण्यासाठी पाच धावा कमी असताना बाद झाला. 

यांच्यानंतर, शतक करून जम बसवलेल्या लबूशेनला देखील टी नटराजनने बाद केले. लबूशेनने पहिल्या डावात 204 चेंडूंचा सामना करताना 108 धावा केल्या. यादरम्यान त्याने 9 चौकार खेचले. लबूशेन आऊट झाल्यानंतर कॅमेरून ग्रीन आणि कर्णधार टीम पेन क्रीझवर खेळत आहे. कॅमेरून ग्रीन 28 धावांवर आणि टीम पेन 38 धावांवर खेळत आहे. तर पहिल्या दिवशीच्या पहिल्या डावात गोलंदाजी करताना टी नटराजनने दोन विकेट्स घेतलेल्या आहेत. यानंतर मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी एक-एक बळी मिळवलेले आहेत. 

दरम्यान, चौथ्या सामन्यासाठी भारतीय संघात चार बदल झाले आहेत. तिसऱ्या सामन्यातील भारतीय संघाची तुलना केल्यास जसप्रीत बुमराह, हनुमा विहारी, रवींद्र जडेजा आणि आर अश्विन हे चौघेही दुखापतीमुळे ब्रिस्बेनच्या सामन्यातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर मैदानात उतरले असून, त्यांचे कसोटीत पदार्पण झाले आहे. व याउलट कांगारूंच्या संघात एक बदल झाला आहे. विल पुकोव्हस्की दुखापतीमुळे प्लेयिंग इलेव्हन मधून बाहेर पडला असून, त्याच्या जागी  मार्कस हॅरिसला संधी देण्यात आली आहे.               

संबंधित बातम्या