
India vs Australia: फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ भारत दौरा करणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध बॉर्डर-गावसकर मालिका म्हणजेच 4 सामन्यांची मालिका खेळायची आहे. तसेच तीन सामन्यांची वनडे मालिकाही होणार आहे. दरम्यान, कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने 18 जणांचा संघ जाहीर केला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या संघात व्हिक्टोरियाच्या 22 वर्षीय ऑफ-स्पिनर टॉड मर्फीलाही संधी मिळाली आहे. याशिवाय भारतातील खेळपट्ट्यांच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियाने 4 फिरकीपटूंना संधी दिली आहे. यामध्ये नॅथन लायन, मर्फी, मिशेल स्विप्सन आणि ऍश्टन एगार यांचा समावेश आहे. तसेच 6 वेगवान गोलंदाजांचा पर्याय देखील ऑस्ट्रेलियाकडे या मालिकेसाठी असणार आहे.
(Australia Test squad for tour of India announced)
त्याचबरोबर पीटर हँड्सकॉम्बचेही ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमन झाले आहे. तसेच कॅमेरॉन ग्रीन आणि मिशेल स्टार्क दुखापतीतून लवकर सावरतील अशा अपेक्षेने त्यांनाही संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज लान्स मॉरिसलाही संघात संधी मिळाली आहे. तसेच संघात पॅट कमिन्स, जोश हेजलवूड आणि स्कॉट बोलंड हे वेगवान गोलंदाजही संघात आहेत.
याबरोबरच स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, मार्नस लॅब्युशेन, उस्मान ख्वाजा, ट्रेविस हेड, ऍलेक्स कॅरे असे अनुभवी फलंदाजांना ऑस्ट्रेलिया संघात संधी मिळाली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. ही मालिका 13 मार्चला संपेल. तसेच वनडे मालिकेला 17 मार्चपासून सुरुवात होईल.
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ -
पॅट कमिन्स (कर्णधार), ऍश्टन एगार, स्कॉट बोलंड, ऍलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेजलवूड, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिशेल स्टार्क, मिशेल स्विप्सन, डेव्हिड वॉर्नर.
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा 2023
कसोटी मालिका (बॉर्डर-गावसकर ट्रॉफी)
9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी - पहिली कसोटी, नागपूर
17 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी - दुसरी कसोटी, दिल्ली
1 मार्च ते 5 मार्च - तिसरी कसोटी, धरमशाला
9 मार्च ते 13 मार्च - चौथी कसोटी - अहमदाबाद
वनडे मालिका
17 मार्च - पहिला वनडे, मुंबई
19 मार्च - दुसरा वनडे, विशाखापट्टणम
22 मार्च - तिसरा वनडे, चेन्नई
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.