ऑस्ट्रेलियात `भोळें`कडे केला विराटने ब्रेकफास्ट

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

कॅनबेरातील वास्तव्यात भारतीय संघातील काही मोजक्‍या खेळाडूंनी ‘सेव्हन बाय द लेक’ नावाच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन ब्रेकफास्ट केला.

कॅनबेरा :  कॅनबेरातील वास्तव्यात भारतीय संघातील काही मोजक्‍या खेळाडूंनी ‘सेव्हन बाय द लेक’ नावाच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन ब्रेकफास्ट केला. हे रेस्टॉरंट भोळे नावाच्या महाराष्ट्रीयन माणसाचे आहे. कप्तान विराट कोहली, के एल राहुल आणि हार्दिक पंड्याने ब्रेकफास्ट करून झाल्यावर कुतूहलाने वाट बघणाऱ्या लहान मुलांना सुरक्षित अंतर राखत फोटो आणि सह्याही दिल्या. कॅनबेरात भारतीय संघ असल्यावर या रेस्टॉरंटमध्ये आवर्जून भेट देत असतो.

 

अधिक वाचा :

आयएसएलच्या कालच्या सामन्यात दुखापतग्रस्त हैदराबादची जमशेदपूरशी 1-1 बरोबरी

 

संबंधित बातम्या