Australia Vs India: संघाच्या पराभवावर मायकल क्लार्क चांगलाच भडकला

Australia Vs India: संघाच्या पराभवावर मायकल क्लार्क चांगलाच भडकला
Australia Vs India Australia Were Scared To Lose said Former Australian cricketer Michael Clark

ब्रिस्बेन: ब्रिस्बेनच्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर आपले नाव कोरत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. पितृत्व रजेमुळे विराट कोहली भारतात परतल्यानंतर आणि अ‍ॅडलेडमधील लाजिरवाण्या पराभवानंतर सर्व क्रिकेट दिग्गजांनी म्हटले  होते  की, टीम इंडिया या कसोटी मालिकेत पराभूत होईल.

पण भारतीय संघाने आपल्या दिमाखदार विजयाने त्या सर्वांचं तोंड बंद केलं आहे. या टिकाकारांमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कचाही समावेश होता. ऑस्ट्रेलियाचा 32 वर्षांचा रेकॉर्ड तुटल्याने मायकल क्लार्क संतापला आणि ऑस्ट्रेलियाच्या संघाला त्याने चांगलंच सुनावलं आहे.
क्लार्कने काय भाकीत वर्तवलं होतं -

विराट कोहली भारतात पितृरजेवर परतल्यानंतर क्लार्कने भातीय संघ अडचणीत असल्याचं म्हटलं होतं. “विराट कोहलीशिवाय पुढील कसोटी सामन्यांत तुम्ही भारतीय फलंदाजीचा विचारही करु शकत नाही. टीम इंडिया आता मोठ्या संकटात अडकणार आहे,” असं क्लार्कने म्हटलं होतं.

पण टीम इंडियाच्या विजयानंतर ,“आपण 20 ओव्हर्स ठेवून पराभूत झालो की शेवटच्या चेंडूवर यामुळे फरक पडत नाही. आपल्याला तो खेळ जिंकायचा होता. सामन्याच्या पहिल्या चेंडूपासून ते शेवटच्या चेंडूपर्यंत ऑस्ट्रेलियाने त्याच दृष्टीकोनातून खेळायला हवं होतं,” असं मत क्लार्कने व्यक्त केलं आहे.

ब्रिस्बेनच्या गाब्बा मैदानावर टीम इंडियाचा कस लागणार होता, कारण 1988 पासून कांगारूंचा इथं पराभव झाला नव्हता. अनेक महत्त्वाचे खेळाडू जखमी झाल्यानंतर भारतीय संघात चार बदल करावे लागले होते. भारताच्या युवा खेळाडूंना आणि भारतीय संघाला कोहलीशिवाय मैदान कसं जिंकायचं हे माहिती आहे, हा संदेश या ऐतिहासिक खेळीनं संपूर्ण क्रिकेट विश्वाला दिला आहे.

आणखी वाचा:

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com