'पहिल्या कसोटी सामन्यात विराट माझ्यामुळे धावचीत झाला, पण त्यानी खिलाडूवृत्तीनी मला माफ केलं"

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 26 डिसेंबर 2020

आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवला, तर सगळे नीट होईल, असे विराटने पहिली कसोटीनंतर आम्हाला सांगितले होते, असे रहाणेने सांगितले. तो म्हणाला. विराट तसेच मोहम्मद शमी यांची अनुपस्थिती नक्कीच जाणवेल; पण त्यांच्याऐवजी खेळणाऱ्यांना आपले कसब दाखवण्याची चांगली संधी आहे, यास मी जास्त महत्त्व देत आहे. 

मेलबर्न :   दोन- तीन दिवस आम्ही जोरदार सराव केला आहे. दुसऱ्या कसोटीच्या पूर्वतयारीबाबत मी समाधानी आहे. या मैदानाचा मला उत्तम अनुभव आहे. इथे धावा निघू शकतात याचा अंदाज आहे. फक्त सुरुवात चांगली होण्याची गरज आहे, असे भारतीय क्रिकेट संघाचा हंगामी कर्णधार अजिंक्‍य रहाणेने सांगितले. आपली बलस्थाने ओळखून खेळ केला. एकमेकांना साथ देत खेळलो. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवला, तर सगळे नीट होईल, असे विराटने पहिली कसोटीनंतर आम्हाला सांगितले होते, असे रहाणेने सांगितले. तो म्हणाला. विराट तसेच मोहम्मद शमी यांची अनुपस्थिती नक्कीच जाणवेल; पण त्यांच्याऐवजी खेळणाऱ्यांना आपले कसब दाखवण्याची चांगली संधी आहे, यास मी जास्त महत्त्व देत आहे. 

आमच्या क्षेत्ररक्षणात सुधारणा होण्याची नितांत गरज आहे. एक दोन चांगले झेल सामन्याचे चित्र बदलू शकतात. आम्ही सरावात खूप मेहनत घेतली आहे. झेल पकडण्याबाबत सुधारणा नक्कीच दिसेल, असे रहाणेने सांगितले. तो म्हणाला, पुन्हा भारतीय संघाचे नेतृत्व करायला मिळते आहे याचा खूप अभिमान वाटतो. मी दडपण घेणार नाही. सतत फक्त सकारात्मक विचार करणार आहे. दुसऱ्या सामन्यात भक्कम खेळ करून संधी कशी साधायची याकडेच लक्ष देणार आहे. अर्थातच प्रकाशझोत माझ्यावर नसून संघावर आहे. मी शांत दिसत असलो, तरी नेतृत्व करताना मी खंबीर असतो आणि फलंदाजी करताना आक्रमक असेन.  पहिल्या कसोटीत आम्ही चांगली फलंदाजी केली होती. खेळपट्टीचा विचार करता फलंदाजी सोपी नक्कीच नव्हती. प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजही सातत्याने चकत होते. आपल्या फलंदाजांनी चांगले तंत्र दाखवले होते आणि त्यामुळेच आपण पहिले दोन दिवस सुस्थितीत होतो. तिसऱ्या दिवशी जे झाले ते झाले. तो एक तास म्हणजे अपघात होता, असे मला वाटते. एका तासात आणि ३६ धावांत बाद होण्याइतका आपला संघ खराब नक्कीच नाही. त्यामुळेच मला आगामी तीन कसोटी संकट नाही; तर संधी वाटत आहे, असेही रहाणेने सांगितले.

"पहिल्या सामन्यात माझ्या चुकीमुळे विराट धावचीत झाला. मी त्याची माफी मागितली. त्याने हे खिलाडू वृत्तीने घेतले. आमची भागीदारी जमत असताना हे घडले आणि त्यानंतर सर्वच चित्र बदलले, त्याची मला जास्त खंत आहे. या विकेटने पहिल्या कसोटीला कलाटणी मिळाली."
- अजिंक्‍य रहाणे

संबंधित बातम्या