अखेरचा सामना जिंकून इंग्लंडविरुद्ध कांगारूंनी व्हाईटवॉश टाळला

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

पहिल्या दोन सामन्यांत इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या जॉस बटलरची अनुपस्थिती या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पथ्यावर पडली.

लंडन: कर्णधार ॲरॉन फिन्च आणि मिशेल मार्श यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे ऑस्ट्रेलियाने अखेरचा ट्‌वेन्टी-२० सामना जिंकला आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत व्हॉईटवॉश टाळला. हुकमी फलंदाज स्टीव स्मिथचे अपयश मात्र ऑस्ट्रेलियाला चिंतेत टाकणारे आहे.

पहिल्या दोन सामन्यांत इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या जॉस बटलरची अनुपस्थिती या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पथ्यावर पडली.

संक्षिप्त धावफलक:
इंग्लंड २० षटकांत ६ बाद १४५ (जॉनी बॅअरिस्टो ५५-४४ चेंडू, ३ चौकार, ३ षटकार, मोईन अली २३-२१ चेंडू, २ चौकार, १ षटकार, डेन्ली नाबाद २९-१९ चेंडू, ४ चौकार, मिशेल स्टार्क २०-१, हॅझलवूड २३-१, झॅम्पा ३४-२) पराभूत वि. ऑस्ट्रेलिया: १९.३ षटकांत ५ बाद १४६ (अॅरॉन फिन्च ३९-२६ चेंडू, ४ चौकार, १ षटकार, स्टॉनिस २६-१८ चेंडू, ५ चौकार, ग्लेन मॅक्‍सवेल ६, स्टीव स्मिथ ३, मिशेल मार्श नाबाद ३९-३६ चेंडू, २ चौकार, १ षटकार, आदील रशीद २१-३)

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या