'मला कसोटी क्रिकेटमध्ये पुन्हा यायचायं...: Glenn Maxwell

Test Cricket: मॅक्सवेल पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेसाठी परतण्याची शक्यता आहे.
Glenn Maxwell
Glenn MaxwellDainik Gomantak

Glenn Maxwell: ODI आणि T20 फॉरमॅटमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक, ग्लेन मॅक्सवेल त्याच्या कसोटी कारकिर्दीत पुनरागमन करण्यास उत्सुक आहे. मॅक्सवेल 2015 विश्वचषक, गेल्या वर्षीच्या टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होता. मॅक्सवेलला आता त्याच्या कारकिर्दीत कसोटी क्रिकेटमध्ये परतायचे आहे. मॅक्सवेल पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारत आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील कसोटी मालिकेसाठी परतण्याची शक्यता आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये विशेष काही करु शकलो नाही

मॅक्सवेलने 2013 मध्ये भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने आतापर्यंतच्या कारकिर्दीत केवळ 6 कसोटी सामने खेळले आहेत. गेल्या महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ट्रॅव्हिस हेडच्या जागी मॅक्सवेलचा ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्यात आला होता. परंतु ट्रॅव्हिस वेळेआधीच सावरला त्यामुळे मॅक्सवेल प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडला. मात्र आता, मॅक्सवेल आपल्या कसोटी कारकिर्दीत पुनरागमन करण्यास उत्सुक आहे.

Glenn Maxwell
भारत-ऑस्ट्रेलिया द्विपक्षीय मालिकेची घोषणा: वाचा कधी होणार कोणता सामना

ईएसपीएनक्रिकइन्फोशी बोलताना मॅक्सवेलने सांगितले की, 'श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीला मुकल्यानंतर लवकरच कसोटी क्रिकेटमध्ये परतण्याची इच्छा आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेवर माझी नजर आहे.'

Glenn Maxwell
WWC च्या इतिहासात पहिल्यांदाच घडली अशी घटना! भारत अन् ऑस्ट्रेलिया बनले साक्षीदार

भारताविरुद्धच्या कसोटीत संधी मिळू शकते

श्रीलंकेविरुध्दच्या (Sri Lanka) कसोटीला मुकल्यानंतर मॅक्सवेलला संघ व्यवस्थापनाकडून आगामी मालिकेत संधी मिळेल अशी आशा आहे. ट्रॅव्हिस या सामन्यात चांगली कामगिरी करत नसल्यामुळे मॅक्सवेलला भारताविरुद्धच्या (India) संघ निवडीत संधी दिली जाऊ शकते. मॅक्सवेलने त्याच्या कारकिर्दीतील 7 कसोटी सामने आशिया खंडात खेळले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com