एका ऑस्ट्रेलियन तरूणीने विराट कोहली आणि अनुष्काकडे केली इच्छा, म्हणाली.. ‘तुमचं बाळ ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम फलंदाज बनेल’

दैनिक गोमन्तक
शनिवार, 26 डिसेंबर 2020

एका ऑस्ट्रेलियन महिला अँकरने विराटला हटके सल्ला दिला आहे. ऑस्ट्रेलियातील महिला क्रिकेट अँकर असणाऱ्या क्लॉय अमांडा बेलीने विरूष्काला ऑस्ट्रेलियामध्ये येऊन बाळाला जन्म द्यावा असा सल्ला दिला आहे.

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली पालकत्व रजा घेऊन भारतात परतला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅडलेड कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला.  हा सामना संपल्यानंतर कर्णधार विराट कोहली भारतात परतला आहे.

का परतला विराट मायदेशी?

विराट कोहलीची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या गर्भवती आहे आणि या  जानेवारी महिन्यात ती बाळाला जन्म देणार आहे. तेव्हा विराटने पालकत्व रजा घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो भारतात परतला आहे.  आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मादरम्यान परिवारासोबत राहण्यासाठी आणि अनुष्काची बाळंतपणात काळजी घेण्यासाठी बीसीसीआयने विराटला ही रजा मंजूर केली आहे.  विराटच्या या निर्णयाला अनेकांनी पाठिंबा दिला असून, अनेकांना विराटचं अशाप्रकारे तीन कसोटी सामने शिल्लक असताना परतणं पटलेलं नाही. काहींनी विरोध दर्शविला आहे, आणि सोबतच वेगवेगळे सल्ले सुद्धा दिले आहेत.

कुणी केली विरूष्काकडे इच्छी व्यक्त?

दरम्यान एका ऑस्ट्रेलियन महिला अँकरने विराटला हटके सल्ला दिला आहे. ऑस्ट्रेलियातील महिला क्रिकेट अँकर असणाऱ्या क्लॉय अमांडा बेलीने विरूष्काला ऑस्ट्रेलियामध्ये येऊन बाळाला जन्म द्यावा असा सल्ला दिला आहे. विराटच्या मुलाने ऑस्ट्रेलियाकडून खेळावे अशी इच्छा ही व्यक्त केली आहे. "असं झाल्यास तूमचं बाळ भविष्यात ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट खेळणार आणि येथील सर्वोत्तम फलंदाज देखिल होईल असंही क्लॉयने म्हटलं आहे." क्लॉय एवझ्यावरच थांबली नाही तर ही इच्छा व्यक्त करतांना क्लॉयने एक भन्नाट मिम शेअर केलं आहे. आणि विरूष्का कडे  ही मागणी केली आहे.

काय आहे हे मिम?

शेअर केलेलं मीम हे हेराफेरी चित्रपटामधील बाबू भय्यांवर आधारित म्हणजेच अभिनेता परेश रावलने साकारलेल्या भूमिकेवर आधारीत आहे. यामध्ये बाबू भय्या ‘मस्त प्लॅन हैं  रे बाबा’ असं सांगतात आणि तसच मीम क्लॉयने शेअर करत ‘मस्त प्लॅन हैं’ असं म्हटलं आहे.

संबंधित बातम्या