भारतीय गाण्यावर नाचतोय ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नर;  'हा' व्हिडओ एकदा पहाच 

दैनिक गोमंतक
रविवार, 23 मे 2021

34 वर्षीय डेव्हिड वॉर्नरने बर्‍याच भारतीय जाहिरातींही केल्या आहेत. मात्र अलीकडे तो एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे.  याचे कारण  म्हणजे डेव्हिड वॉर्नरचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. दाक्षिणात्य (South Indian)अभिनेत्री साई पल्लवीसोबत (Sai Pallavi)  तो एका लोकप्रिय गाण्यांवर नाचताना दिसत आहेत.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज (Australian batsman) डेव्हिड वॉर्नर (David Warner)  आयपीएलमध्ये (IPL) सामील झाल्यानंतर भारतीय  क्रिकेटपटूंशी त्याचे मैत्रीचे एक वेगळेच नाते निर्माण झाले आहे.   भारतीय संघाशी स्पर्धा करण्यासाठी तो बर्‍याच वेळा भारतात आला आहे. सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)  संघाचे  कर्णधार पदही त्याने भूषवले आहे. इतकेच नव्हे तर आयपीएलमध्ये त्याच्या नावावर अनेक आश्चर्यकारक रेकॉर्डसही आहेत. 34 वर्षीय डेव्हिड वॉर्नरने बर्‍याच भारतीय जाहिरातींही केल्या आहेत. मात्र अलीकडे तो एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे.  याचे कारण  म्हणजे डेव्हिड वॉर्नरचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. दाक्षिणात्य (South Indian)अभिनेत्री साई पल्लवीसोबत (Sai Pallavi)  तो एका लोकप्रिय गाण्यांवर नाचताना दिसत आहेत.

ऑलिंपिक पात्र खेळाडूंचे झाले लसीकरण

त्याच्या या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी लाईक्स  आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. मात्र निरखून पहिले असता वॉर्नरने प्रत्यक्ष या गाण्यावर डान्स केलेला नाही.  दाक्षिणात्य अभिनेता धनुषचे लोकप्रिय गाणे राउडी बेबी या गाण्यात त्याने धनुषऐवजी डीपफेक (व्हिडिओ किंवा फोटोतिल प्रतिमा बदलने)  केले आहे. व्हिडिओमध्ये तो कोस्टार साई पल्लवीसह नाचताना दिसत आहे. व्हिडिओ डीपफेक्ड केल्यानंतर त्याने तो त्याच्या  अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर  पोस्ट केला आहे, जो प्रचंड व्हायरल होत आहे. चाहत्यांनीदेखील या व्हीडिओला खूप पसंती दिली असून लोक त्यावर मजेदार कमेंट्स देत आहेत. खरं तर डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतो आणि असे व्हिडिओ शेअर करत असतो.  त्याचे अनेक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत असतात.  यावेळी त्याने एका महिन्यानंतर डेव्हिड वॉर्नरने इन्स्टाग्रामवर  हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

त्याचे चाहतेदेखील त्याच्या व्हिडिओची वाट पाहत असतात.  वॉर्नरने हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्यांच्या एका  चाहत्याने त्याला कमेंट दिली आहे. एका युजरने, 'बॉस इज बॅक' अशी कमेंट केली आहे तर दुसर्‍याने, ' तू टॉलीवूड सिनेमात ट्राय का करत नाही,' असे म्हटले आहे.  तथापि, वॉर्नरने डान्स केलेल्या या गण्याबद्दल बोलायचे झाल्यास राऊडी बेबी हे  दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय गाने आहे. 2018 मध्ये आलेल्या मारी 2 चित्रपटातील हे गाणे असून अभिनेता धनुष आणि अभिनेत्री साई पल्लवी या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहेत. आतापर्यंत  हे गाणे 1.1 अब्जपेक्षा जास्त वेळा पाहिले गेले आहे.

संबंधित बातम्या