ऑस्ट्रेलिया संघातील नवोदित पुकोस्कवी सोशल मीडियापासून दूर

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

 भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत प्रथमच संधी मिळालेला नवोदित खेळाडू विल पुकोस्कवी याने चर्चा आणि तर्कवितर्कांपासून दूर राहाण्यासाठी स्वतःचे सोशल मीडियावरचे अकाऊंट काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मेलबर्न :   भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत प्रथमच संधी मिळालेला नवोदित खेळाडू विल पुकोस्कवी याने चर्चा आणि तर्कवितर्कांपासून दूर राहाण्यासाठी स्वतःचे सोशल मीडियावरचे अकाऊंट काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पुकोस्कवीने शेफिल्ड शिल्ड स्पर्धेतून चांगली चमक दाखवलेली आहे. त्याच्यावर ऑस्ट्रेलियात सर्वांचे लक्ष आहे. भारताविरुद्धच्या मालिकेसाठी निवड होताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे, याचा आपल्या एकाग्रतेवर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून त्याने सोशल मीडियापासून दूर रहाणे पसंत केले आहे.  

आपली तयारी कशी असू शकते यावर मी लक्ष देऊ शकतो, सरावात फलंदाजी चांगली होत आहे. आता सोशल मीडियापासून दूर राहिल्यामुळे माझे काम सोपे होत आहे, लक्ष विचलित होत नाही, कोणीही मला टॅग केले तरी माझ्यापर्यंत कोणताही संदेश पोहचत नाही, असे पुकोस्कवीने सांगितले.

पुकोस्कवी आणि कॅमेरून ग्रीनसह पाच नवोदितांना ऑस्ट्रेलियाने प्रथमच संधी दिली आहे. २२ वर्षीय पुकोस्कवीने शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत सलग दोन द्विशतके केलेली आहेत. त्याच्या निवडीमुळे डेव्हिड वॉर्नरचा सलामीचा साथीदार कोण असणार याची उत्सुकता असेल, परिणामी ज्यो बर्न्सवर दडपण आले आहे. बर्न्सही चांगल्या फॉर्मात आहे, असे ऑस्ट्रेलिया प्रशिक्षक जस्टीन लॅंगर यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले आहे.

अधिक वाचा

ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनादेखील कोहलीचा खेळ आवडतो

स्मिथ वॉर्नरचे व स्मिथचे असणे हे आव्हान

संबंधित बातम्या