'ॲलिसा'ची कमाल.. ५२ चेंडूंत केल्या १११ धावा

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

 ऑस्ट्रेलियाची यष्टिरक्षक ॲलिसा हिली हिने बिग बॅश लीगमध्ये ५२ चेंडूंत १११ धावांचा तडाखा दिला. तिच्या विक्रमी चौथ्या शतकानंतर सिडनी सिक्‍सर्स संघाचे स्पर्धेतील आव्हान आटोपले.

सिडनी :  ऑस्ट्रेलियाची यष्टिरक्षक ॲलिसा हिली हिने बिग बॅश लीगमध्ये ५२ चेंडूंत १११ धावांचा तडाखा दिला. तिच्या विक्रमी चौथ्या शतकानंतर सिडनी सिक्‍सर्स संघाचे स्पर्धेतील आव्हान आटोपले.

हिलीने स्पर्धेतील चौथे शतक करताना संघासमोर खडतर आव्हान सर करण्याचा प्रयत्न केला; पण अखेर ते निव्वळ धावगतीत कमी पडले. मेलबर्न स्टार्सची १९ षटकांत १७८ धावांचे लक्ष्य समोर असताना हिली मैदानात आली. तिने ४८ चेंडूत शतक करीत स्पर्धेतील सर्वात वेगवान शतक केले. १५ चौकार आणि ५ षटकारांची आतषबाजी केलेली हिली अखेर धावचीत झाली. त्यामुळे तिचा लीगमधील सर्वाधिक धावांचा विक्रमही हुकला. लीगमधील आघाडीच्या पाचपैकी चार धावसंख्या हिलीच्या आहेत; पण सर्वोत्तम धावा पुन्हा दुरावल्या हे तिला सलत असेल.
हिलीने एलीसा पेरीच्या साथीत १४ षटकांत दीडशे धावांची सलामी दिली होती; पण त्यांनी दहा चेंडूत चार विकेट गमावल्या. सिडनीने त्यानंतरही विजय मिळवला; पण त्यांना आवश्‍यक धावगती उंचावता आली नाही आणि संघाचे आव्हान साखळीतच संपले.

मंजुरी नसलेली खेळाडू निवडल्याने दंड

सिडनी सिक्‍सर्सने अखेरच्या लढतीसाठी हिली सिल्व्हर होम्स हिची निवड केल्याने त्यांना २५ हजार ऑस्ट्रेलियन डॉलरचा दंड करण्यात आला. स्पर्धा सुरू झाल्यानंतर काही दिवसांत होम्सला दुखापत झाली होती. तिच्याऐवजी बदली खेळाडू निवडण्यात आली. होम्स तंदुरुस्त झाल्याने तिचा पुन्हा प्राथमिक संघात समावेश करण्यात आला; पण त्यास तांत्रिक समितीने मंजुरी दिली नव्हती. सामना सुरू झाल्यावर सिडनीस आपली चूक लक्षात आली. त्यांनी तिला ब्रेकच्या वेळी संघाबाहेर काढले. संघाने कोणत्याही कारवाईपूर्वी आपल्याकडून चूक झाल्याची कबुली दिली; तसेच होम्स सामन्यात खेळली नव्हती. त्यामुळे त्यांचा दंड निम्मा करण्यात आला.

आणखी वाचा :

आंगुलोच्या धडाक्यामुळे एफसी गोवाने बंगळूरला बरोबरीत रोखले

ओडिशा एफसीविरुद्धच्या आजच्या लढतीत हैदराबाद संघाची प्रतिष्ठा पणास

संबंधित बातम्या