आस्ट्रेलिया विरूद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर;..हे खेळाडू संघाबाहेर

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणाऱ्या भारत विरूद्ध आस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. बीसीसीआयने आपल्या ट्विटरवरून या संघाची घोषणा केली आहे.

मेलबर्न : मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणाऱ्या भारत विरूद्ध आस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. बीसीसीआयने आपल्या ट्विटरवरून या संघाची घोषणा केली आहे. कर्णधार विराट रोहली मायदेशी परतल्याने कर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे आले आहे.

भारतीय संघ - अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), शुभमन गिल (पदार्पण),मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी,रिषभ पंत(यष्टीरक्षक),रविश्चंद्रन अश्विन, उमेश यादव,  जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज (पदार्पण )

पहिल्या कसोटी सामन्यातले हे खेळाडू संघाबाहेर :
पहिल्या कसोटी सामन्यात चांगली कामगिरी करण्यास अपयशी ठरलेल्या पृथ्वी शॉ आणि वृद्धिमान साहाला संघाबाहेर बसावे लागणार आहे, तर मोहम्मद शमी दुखापतग्रस्त असल्याने खेळू शकणार नाही.

अॅडलेड मध्ये खेळवल्या गेलेल्या ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या 
पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी एकाच सेशनमध्ये अशी काही गोलंदाजी केली की जिंकण्याच्या मूडमध्ये असणाऱ्या भारतीय संघाला हारण्याच्या  दारात नेऊन ठेवले. ऑस्ट्रेलियाकडून हेजलवूडने सर्वाधिक पाच गडी बाद करत भारतीय संघाचे कंबरडेच मोडले.  मालिकेच्या पहिल्याच सामन्यात भारत पराभूत होऊन बॅकफूटवर गेल्याने पुढील सामन्यांमध्ये भारतीय संघावर दबाव वाढणार आहे.  

ऑस्ट्रेलिया संघ - टीम पेन(कर्णधार), जो बर्न्स, मॅथ्यु वेड, मार्कस लबुशेन, स्टीव्ह स्मिथ, कॅमेरून ग्रीन, ट्रेविस हेड, पॅट कमिंस, मिशेल स्टार्क, जोश हेझलवूड, नॅथन लायन,   

ठिकाण- मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड
 

संबंधित बातम्या