Asia Cup 2023: फायनलपूर्वी अक्षर पटेलला दुखापत, श्रीलंकेविरुद्ध 'या' ऑलराउंडरची होणार टीम इंडियात एन्ट्री?

Axar Patel: आशिया चषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाला आहे.
Axar Patel
Axar PatelDainik Gomantak

Axar Patel May ruled out from Asia Cup Final 2023: आशिया चषक 2023 स्पर्धेत रविवारी (17 सप्टेंबर) भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. श्रीलंकेतील कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना होणार आहे. पण या सामन्याआधी भारताच्या अडचणीत वाढ झाली आहे.

भारताचा डावखुरा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याला शुक्रवारी (15 सप्टेंबर) बांगलादेशविरुद्ध खेळताना छोटी दुखापत झाली आहे. त्यामुळे तो श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्याला मुकण्याची दाट शक्यता आहे. त्याचमुळे त्याला कव्हर म्हणून वॉशिंग्टन सुंदर भारतीय संघात सामील होणार आहे.

Axar Patel
Axar Patel Marriage: गर्लफ्रेंडला 'मान मेरी जान' म्हणत थिरकला अक्षर, लग्नातील Video व्हायरल

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार अक्षरला बांगलादेश विरुद्ध फलंदाजी करताना हाताला चेंडू लागला होता. त्याच्या हाताच्या कोपराला दुखापत झाल्याची शक्यता आहे. त्याचे स्कॅन करण्यात आले असून अद्याप त्याचे रिपोर्ट्स येणे बाकी आहे. त्यामुळे तो अंतिम सामना खेळण्याची शक्यता कमी आहे.

दरम्यान, असे असले तरी तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध 22 सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेपूर्वी पूर्ण तंदुरुस्त होण्याची शक्यता आहे.

सुंदर ठरणार पर्याय

सुंदर सध्या बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये एशियन गेम्ससाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघाबरोबर आहे. पण आता तो कोलंबोला जाण्याची शक्यता आहे. तसेच आशिया चषकाच्या अंतिम सामन्यानंतर पुन्हा बंगळुरूमध्ये एशियन गेम्ससाठी भारतीय संघाच्या शिबिरात सामील होईल. हे शिबिर 23 सप्टेंबरपर्यंत होणार आहे.

Axar Patel
IND vs BAN: शुभमन गिलचं शतक होऊनही का हरली टीम इंडिया, जाणून घ्या 5 कारणे

तथापि, जर सुंदरला श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामन्यात खेळवले, तर भारताला ऑफ स्पिनरचा चांगला पर्याय मिळेल, तसेच तो तळातही चांगली फलंदाजी करू शकतो.

अक्षरची झुंज अपयशी

बांगालादेशने शुक्रवारी भारतासमोर 266 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची पडझड झाली होती. पण अक्षरने शतकवीर शुभमन गिलबरोबर सातव्या विकेटसाठी 39 धावांची आणि शार्दुल ठाकूरबरोबर आठव्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी करत भारताला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.

मात्र, भारत विजयाच्या जवळ असताना तो 34 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 42 धावा करून बाद झाला. अखेर या सामन्यात भारताचा 6 धावांनी पराभव झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com