
Pakistan Captain Babar Azam: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावातही त्याने शतक झळकावले होते. पाकिस्तानच्या संघाला आता बाबरकडून दुसऱ्या कसोटीतही अशाच कामगिरीची अपेक्षा असेल, जिथे श्रीलंकेने पाकिस्तानसमोर विजयासाठी 508 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात बाबरने आणखी एक मोठी कामगिरी आपल्या नावावर नोंदवली आहे.
दरम्यान, बाबरने कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावांचा टप्पा ओलांडला आहे. अशी कामगिरी करणारा तो पाकिस्तानचा (Pakistan) सातवा कर्णधार ठरला आहे. बाबरने श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka) दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या डावात 38 चेंडूत 26 धावा करुन ही कामगिरी केली आहे. कर्णधार म्हणून तिन्ही फॉरमॅटमध्ये 1000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा बाबर हा पाकिस्तानचा पहिला आणि जगातील पाचवा कर्णधार ठरला आहे.
एमएस धोनी विराट कोहलीच्या क्लबमध्ये सामील झाला
कर्णधार म्हणून तिन्ही फॉरमॅटमध्ये 1000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा बाबर पाकिस्तानचा पहिला कर्णधार ठरला. तसेच कर्णधार म्हणून तिन्ही फॉरमॅटमध्ये 1000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो जगातील पाचवा कर्णधारही ठरला आहे. त्याच्या आधी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि विराट कोहली (Virat Kohli), दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि न्यूझीलंडचा विद्यमान कर्णधार केन विल्यमसन यांनी ही कामगिरी केली आहे.
शिवाय, 27 वर्षीय बाबरने पाकिस्तानसाठी 13 कसोटी सामन्यांमध्ये 51.10 च्या सरासरीने 1022 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 15 सामन्यांमध्ये 83.30 च्या सरासरीने 1,083 धावा केल्या आहेत, तर कर्णधार म्हणून 41 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 42.30 च्या सरासरीने 1,396 धावा केल्या आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.