बाबर आझमने चुलत बहिणीशी केला साखरपुडा

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 1 जून 2021

अझरचा सल्ला बाबरने फार गंभीरपणे घेतलेला दिसतो आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) त्याच्या चाहत्यासाठी एक गूड न्यूज दिली आहे. पाकिस्तानी माध्यमांनी (Pakistani media) दिलेल्या माहितीनुसार, आझमचा साखरपुडा पार पडला आहे. बाबरने आपल्याच चुलत बहिणीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या तो वर्षी लग्न करणार आहे. कर्णधार बाबर आझम तीनही स्वरुपामध्ये पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. बाबर आझमला पाकिस्तान संघाचा (Pakistan team) अनुभवी खेळाडू अझर अलीने लग्न करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे अझरचा सल्ला बाबरने फार गंभीरपणे घेतलेला दिसतो आहे.

बाबर आझमवर काही महिन्यांपूर्वी एका महिलेने लैंगिक अत्याचार आणि धमकी दिली असल्याचा आरोप केला होता. बाबरने लग्नाचे अश्वासन दिले असल्याचे या महिलेने सांगितले होते. लाहोरमधील न्यायालयाने (Court in Lahore) पाकिस्तानच्या केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला गुन्ह्याची नोंद करण्याचे आदेश दिले होते. बाबरने या महिलेने लावलेले आरोप फेटाळून लावले होते.  

भारतीय खेळाडूंच्या कुटुंबियांनाही इंग्लंड दौऱ्यासाठी परवानगी

सध्या बाबर आझम अबुधाबीमध्ये असून तेथे तो पीएसएल 6 चे उर्वरित सामने खेळणार आहे. पाकिस्तान संघ बुधवारी मुल्तान सुल्तान्सशी भिडणार आहेत. पीएसएल थांबविण्यात आले, तेव्हा बाबरने पाच सामने खेळत 258 धावा काढल्या होत्या. यामध्ये त्याने 3 अर्धशतेही ठोकली आहेत.   
 

संबंधित बातम्या