बाबर आझमची 'बाबर की कहाणी' होतेय व्हायरल!

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 5 जून 2021

2019 मध्ये पाकिस्तानच्या टी-ट्वेन्टी संघाचा कर्णधार म्हणून बाबरची निवड करण्यात आली होती.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याच्या नावाला वलय प्राप्त झाले आहे. त्याने क्रिकेटमध्ये केलेली प्रगती पाहता तो पाकिस्तानमधील क्रिकेटप्रेमींसाठी आदर्श ठरला आहे. 2015 मध्ये 26 वर्षीय बाबरने आंतरराष्ट्रीय क्रिकटेमध्ये (international cricket) पदार्पण केले आणि लवकरच तो सर्वांचा लाडका बनला. 2019 मध्ये पाकिस्तानच्या टी-ट्वेन्टी संघाचा कर्णधार म्हणून बाबरची निवड करण्यात आली होती. तिन्ही फॉर्मेटमध्ये पाकिस्तानचा कर्णधार सुध्दा बाबर बनला. पुढच्या पिढ्यांसाठी बाबरचा प्रवास प्रेरणादायी आहे. बॉल बॉय म्हणून लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर (Gaddafi Stadium in Lahore) क्रिकेटला सुरुवात करणाऱ्या बाबरने आपले कौशल्य पणाला लावत अत्यंत मेहनतीने हे साम्राज्य उभे केले. (Babar Azams Babar Ki Kahani is going viral)

बाबर आझमने चुलत बहिणीशी केला साखरपुडा

बाबर आता आपली कहाणी सर्वांसमोर आणणार आहे. बॉल बॉय ते पाकिस्तान क्रिकेट संघाचा एक यशस्वी कर्णधार हा प्रवास तो 'बाबर की कहाणी' (Babar's story)याद्वारे मांडणार आहे. सोशल मिडियावरील ट्विटरवरुन बाबरने 'बाबर की कहाणी' चे पोस्टर शेअर केले आहे. त्याची  ही कहाणी उद्या लॉंच होणार आहे.

व्हायरल! 'बाबर की कहानी'
बाबर आझमचे हे ट्विट कमी कालावधीतच हजारो क्रिकेटप्रेमींनी रिट्विट केले आहे. एका ट्विटर वापरकर्त्यांने लिहिले की, बाबर तू चांगला आहेस. पण अद्याप अजून बराच पल्ला तुला गाठायचा आहे. वर्ल्डकप विजयासह बाबरची कहाणी संपली पाहिजे, असे काहींनी म्हटले आहे. बाबर की कहाणी हे पुस्तक माहितीपट किंवा बायोपिक हे काय आहे ते अजून स्पष्ट झालेले नाही.

संबंधित बातम्या