'वाईट काळ संपला, आता जीवनातील नवा अध्याय'

जानेवारी महिन्यातील संघ बदल प्रक्रियेत तो दिल्ली एफसीकडून गोव्यातील संघाशी अधिकृतपणे करारबद्ध झाला
ISL football

ISL football

Dainik gomantak

पणजी : आयुष्यातील वाईट काळ संपल्यामुळे आनंदित आहे. आता जीवनातील नवा अध्याय असून फुटबॉल खेळायला मिळण्याऱ्या संधीचे स्वागत करतोय. उच्च पातळीवरील मैदानावर येण्यासाठी खूप मोठी प्रतीक्षा करावी लागली, असे सांगत युवा फुटबॉलपटू अन्वर अली याने  एफसी गोवा संघाच्या करारपत्रावर सही केल्यानंतर शनिवारी भावना व्यक्त केल्या.

21 वर्षीय ‘सेंटर बॅक’ अन्वरला एफसी गोवाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (football) मोसमासाठी शनिवारी करारबद्ध केले. तो आयएसएल मोसमाच्या सुरवातीपासून (नोव्हेंबर 2021) एफसी गोवाच्या (goa) मुख्य संघातर्फे सराव करत होता. जानेवारी महिन्यातील संघ बदल प्रक्रियेत तो दिल्ली एफसीकडून गोव्यातील संघाशी अधिकृतपणे करारबद्ध झाला.

<div class="paragraphs"><p>ISL football</p></div>
Ind Vs Pak: 'WC मध्ये भारताला पराभूत करणं, मोमेंट ऑफ द ईयर'!

गुणवान बचावपटू असलेला अन्वर 2017 साली भारताच्या 17 वर्षांखालील विश्वकरंडक संघातून खेळला, मात्र नंतर ह्रदयविषयक समस्या कारणास्तव 2019 साली अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने त्याच्यावर खेळण्यास बंदी लादली. प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयातही गेले. नंतर महासंघाच्या वैद्यकीय समितीने तो खेळण्यास सक्षम असल्याचे मागील ऑगस्टमध्ये जाहीर केले.

... आणि कारकिर्दीस धक्का

अन्वर अली याने युवा दशेतील फुटबॉल कारकिर्दीची सुरवात मिनर्व्हा पंजाबतर्फे केली. बचावफळीतील शानदार कामगिरीने त्याची भारताच्या 17 वर्षांखालील संघात निवड झाली. 2017 साली देशात झालेल्या 17 वर्षांखालील विश्वकरंडक (World Cup) स्पर्धेत तो प्रत्येक सामना खेळला. त्याला अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या इंडियन ॲरोज संघात स्थान मिळाले. नंतर ‘आयएसएल’मधील मुंबई सिटी एफसीने त्याला करारबद्ध केले. वैद्यकीय तपासणीत त्याच्या ह्रदय चाचणीत रक्तपुरवठाविषयक गंभीर बाब समोर आली आणि मेहनती अन्वरच्या बहरणाऱ्या कारकिर्दीस मोठा धक्का बसला. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने त्याच्यावर स्पर्धात्मक फुटबॉल खेळण्यास 2019 साली बंदी लादली.

<div class="paragraphs"><p>ISL football</p></div>
व्हाल्सकिस पुन्हा मूळ संघात, जमशेदपूरचा आघाडीपटू बाकी मोसमासाठी चेन्नईयीनकडे

पुन्हा फुटबॉल मैदानावर

फुटबॉल महासंघाने ऑगस्ट 2021 मध्ये स्पर्धात्मक फुटबॉल खेळण्यास परवानगी दिल्यानंतर, अन्वर मिनर्व्हा अकादमीकडून दिल्ली एफसी संघात दाखल झाला. सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या ड्युरँड कप स्पर्धेत, तसेच आय-लीग पात्रता स्पर्धेत तो खेळला. पात्रता स्पर्धेत त्याने दिल्ली एफसीतर्फे चार गोल नोंदविले. आता रविवारी (ता. 2) त्यांच्या फुटबॉल कारकिर्दीस नवी दिशा गवसणार आहे. केरळा ब्लास्टर्सविरुद्ध त्याला एफसी गोवातर्फे आयएसएल पदार्पणाची संधी लाभू शकते.

‘‘माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल मी याक्षणी एफसी गोवाचा अत्यंत आभारी आहे. मोसमाच्या सुरवातीपासून मी या संघासमवेत आहे आणि त्यामुळे खेळण्याची शैली समजून घेण्यास मला मदत झाली. मी एफसी गोवा संघात सामील होणार हे समजले तेव्हा खूपच हर्षभरीत झालो. एक वेगळाच उत्साह आहे, जो मी शद्बांत व्यक्त करू शकत नाही.’’ - अन्वर अली, एफसी गोवाचा बचावपटू

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com