बंगळूरचाही मुंबई सिटीस धक्का, आयएसएल स्पर्धेत गतविजेत्यांचा आणखी एक पराभव

बंगळूरकडूनही हार स्वीकारल्यामुळे मुंबई सिटीस 5 लढतीतून फक्त 2 गुणांची कमाई करता आली.
बंगळूरचाही मुंबई सिटीस धक्का, आयएसएल स्पर्धेत गतविजेत्यांचा आणखी एक पराभव
ISL footballDainik gomantak

पणजी : माजी विजेत्या बंगळूर एफसीने पूर्वार्धात तीन गोल डागत इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (football) स्पर्धेच्या आठव्या मोसमात मुंबई सिटीला 3-0 फरकाने पराभवाचा धक्का दिला. गतविजेत्या संघाला पाच लढतीत तिसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांना दुसऱ्या स्थानीच राहावे लागले.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सोमवारी झालेल्या लढतीत बंगळूर (Bangalore) एफसीसाठी प्रिन्स इबारा याने दोन गोल केले. कोंगो देशाच्या या 25 वर्षीय आघाडीपटूने अनुक्रमे 23 व 45+4 व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला.

ISL football
राहुल द्रविड विराट कोहली च्या निशाण्यावर

दोन्ही वेळेस त्याला बचावपटू रोशन नाओरेम याच्या असिस्टवर हेडिंगवर अचूक नेम साधता आला. त्याने आता स्पर्धेत एकूण चार गोल केले आहेत. त्यापूर्वी सामन्याच्या आठव्याच मिनिटास श्रीनगरचा 25 वर्षीय मध्यरक्षक दानिश फारूख याने मुंबई सिटीच्या बचावफळीतील चुकीचा लाभ उठवत बंगळूरला आघाडी मिळवून दिली होती. त्याचा हा मोसमातील दुसरा गोल ठरला. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात मुंबई (Mumbai) सिटीने 3-1 फरकाने विजय मिळविला होता, त्याचा वचपा यावेळी बंगळूर एफसीने काढला.

बंगळूरचा हा 11 सामन्यांतील तिसरा विजय ठरला. त्यांचे आता 13 गुण झाले आहेत. ओडिशा एफसीचेही तेवढेच गुण असून सरस गोलसरासरीत बंगळूरच्या संघाला सातवा क्रमांक मिळाला. मुंबई सिटीला एकंदरीत 11 लढतीत चौथा पराभव पत्करावा लागला. त्यांचे आणि केरळा ब्लास्टर्सचे समान 17 गुण आहेत. केरळा ब्लास्टर्सची गोलसरासरी +6 अशी सरस असल्याने ते पहिल्या, तर +2 गोलसरासरीसह मुंबई सिटी संघ दुसऱ्या क्रमांकावर राहिला.

ISL football
IPL 2022: श्रेयस अय्यर होणार कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार?

पूर्वार्धात तीन गोल

सामना सुरू झाल्यानंतर लगेच बंगळूरने मुंबई सिटीचे वर्चस्व भेदले. बंगळूरच्या क्लेटन सिल्वा याच्या पासवर चेंडूला रोखण्याच्या प्रयत्नात मुंबई सिटीच्या मुर्तदा फॉल याचा प्रयत्न पूर्णतः यशस्वी झाला नाही. गोलक्षेत्रासमोर असलेल्या दानिश फारूखने चेंडू ताब्यात घेत योग्य दिशेने अचूक नेमबाजी केली. त्यानंतर बंगळूरच्या प्रिन्स याची उंची मुंबई सिटीच्या फॉल याला भारी ठरली. रोशनच्या कल्पक क्रॉसपासवर प्रिन्सने हेडिंगने लक्ष्य साधताना आपल्या उंचीचा सुरेख लाभ उठविला. पूर्वार्धाच्या भरपाई वेळेत सेटपिसवर प्रिन्सने संघाची आघाडी तीन गोलने मजबूत केली. रोशनच्या कॉर्नर फटक्यावर पुन्हा एकदा मुंबई सिटीच्या फॉल याला असाह्य ठरवत प्रिन्स याने उडी घेत भेदक हेडिंग साधले.

रोशन नाओरेमची असिस्टमध्ये छाप

बंगळूर एफसीचा 22 वर्षीय युवा बचावपटू रोशनसिंग नाओरेम याने यंदाच्या मोसमात असिस्टमध्ये छाप पाडली आहे. या मेहनती खेळाडूने 9 सामन्यांत 5 असिस्टची नोंद करताना गोलमध्ये वाटा उचलला आहे. मोसमातील सर्वाधिक असिस्ट मुंबई सिटीच्या मोरोक्कन अहमद जाहू याने नोंदविले आहेत. 6 असिस्ट व 2 गोल करणारा जाहू सोमवारच्या सामन्यात निलंबनामुळे खेळू शकला नाही. त्याचा फटका मुंबईच्या संघास बसला.

मुंबईला 5 लढतीत फक्त 2 गुण

मुंबई सिटीस मागील लढतीत शेवटच्या क्रमांकावरील ईस्ट बंगालने गोलशून्य बरोबरीत रोखले होते. त्यापूर्वी त्यांना नॉर्थईस्ट युनायटेडनेही बरोबरीत रोखले होते, तर केरळा ब्लास्टर्सवर ओडिशाकडून पराभव पत्करावा लागला होता. सोमवारी बंगळूरकडूनही हार स्वीकारल्यामुळे मुंबई सिटीस 5 लढतीतून फक्त 2 गुणांची कमाई करता आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com