माजी विजेत्या बंगळूरुचा विजयी आरंभ !

बांबोळीतील ॲथलेटिक्स स्टेडियमवर जोरदार पावसात झालेल्या लढतीत त्यांनी नॉर्थईस्ट युनायटेडला (Northeast United) 4-2 फरकाने हरविले.
माजी विजेत्या बंगळूरुचा विजयी आरंभ !
Bangalore FC

पणजी: गतमोसमातील इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेत लौकिकाला साजेशी कामगिरी करू न शकलेल्या माजी विजेत्या बंगळूर एफसीने (Bangalore FC) शनिवारी यंदाच्या मोहिमेस विजयाने आरंभ केला. बांबोळीतील ॲथलेटिक्स स्टेडियमवर जोरदार पावसात झालेल्या लढतीत त्यांनी नॉर्थईस्ट युनायटेडला (Northeast United) 4-2 फरकाने हरविले.

बंगळूर एफसीसाठी ब्राझीलियन क्लेटन सिल्वा (Brazilian Clayton Silva) (14वे मिनिट), जयेश राणे (Jayesh Rane) (42वे मिनिट) यांच्या प्रत्येकी एक गोलव्यतिरिक्त नॉर्थईस्ट युनायटेडच्या माशूर शेरीफ यानेही 22व्या मिनिटास स्वयंगोल केला. नॉर्थईस्टसाठी जमैकन देशॉर्न ब्राऊन याने 17व्या, तर फ्रेंच मथायस कुरियर 25व्या मिनिटास गोल नोंदविला. बदली खेळाडू कोंगो देशाचा प्रिन्स इबारा याने 81व्या मिनिटास बंगळूरच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल केला. नवे प्रशिक्षक मार्को पेझ्झैयोली यांच्या मार्गदर्शनाखाली बंगळूरचा हा पहिला विजय ठरला. मागील मोसमात बंगळूरला सातवा क्रमांक मिळाला होता. पूर्णवेळ प्रशिक्षक या नात्याने खलिद जमिल यांच्या मार्गदर्शनाखाली नॉर्थईस्टला पराभवाचा सामना करावा लागला. गतमोसमात त्यांनी उपांत्य फेरी गाठली होती.

Bangalore FC
एटीके मोहन बागानची दणदणीत विजयी सलामी; केरळा ब्लास्टर्सवर 4-2 फरकाने मात

पूर्वार्धात ‘गोल’ मेजवानी!

जोरदार पावसात सुरू झालेल्या लढतीच्या पहिल्या 45 मिनिटांच्या खेळात पाच गोल झाले. त्यापैकी चार गोल 25 मिनिटांत झाले. बंगळूरचा ब्राझीलियन क्लेटन सिल्वा याने गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. सहकारी उदांता सिंग याच्यासमवेत उत्कृष्ट समन्वय साधत सिल्वाने संघाला आघाडी मिळवून दिली. उदांताने बचावपटूंना चकवत दिलेल्या पासवर सिल्वाने प्रतिस्पर्धी गोलरक्षक सुभाशिष रॉय याने जागा सोडल्याची संधी साधली. त्यानंतर तीन मिनिटांत जमैकन देशॉर्न ब्राऊन याने गुवाहाटीच्या संघास बरोबरी साधून दिली. व्ही. सुहेर याने डाव्या बाजूतून शानदार पासवर ब्राऊनचा नेम अचूक ठरला. माशूर शेरीफच्या स्वयंगोलमुळे नॉर्थईस्टला धक्का बसला व बंगळूरने आघाडी घेतली. यावेळी अगोदर फटका अडविताना अप्रतिम कौशल्य प्रदर्शित केलेल्या नॉर्थईस्टचा गोलरक्षक सुभाशिषच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले. बंगळूरचा आनंद तीन मिनिटेच टिकला. फ्रेंच खेळाडू मथायस कुरियर याने नॉर्थईस्टला 2-2 गोलबरोबरी साधून दिली. मथायसचा फटका अडविण्यासाठी गोलरक्षक गुरप्रीत संधू झेपावला, पण त्याला यश मिळाले नाही, तसेच अजित कामराज यालाही चेंडू रोखणे शक्य झाले नाही. विश्रांतीला तीन मिनिटे बाकी असताना जयेश राणेच्या गोलमुळे माजी विजेत्यांना आघाडी मिळाली. क्लेटन सिल्वाच्या असिस्टवर त्याने सुरेख नेमबाजी केली.

ईस्ट बंगाल-जमशेदपूर लढत आज

रविवारी वास्को येथील टिळक मैदानावर ईस्ट बंगाल व जमशेदपूर एफसी यांच्यात लढत होईल. यंदा ईस्ट बंगाल संघ स्पॅनिश मानोलो डायझ यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत असून जमशेदपूरच्या प्रशिक्षकपदी ओवेन कॉयल कायम आहेत. जमशेदपूरचा प्रमुख आघाडीपटू नेरियूस व्हाल्स्किस याचा धोका ईस्ट बंगालला असेल. गतमोसमात वास्को येथे गोलशून्य बरोबरी झाल्यानंतर फातोर्डा येथे ईस्ट बंगालने जमशेदपूरला 2-1 फरकाने धक्का दिला होता.

Bangalore FC
एटीके मोहन बागानला कृष्णा पावला! केरळा ब्लास्टर्सला एका गोलने नमवून आयएसएलमध्ये विजयी सलामी

दृष्टिक्षेपात सामना...

- नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्धच्या 16 सामन्यात बंगळूरचे 11 विजय

- नॉर्थईस्टच्या मथायस कुरियर याचे गोलसह आयएसएल पदार्पण

- आयएसएलमध्ये क्लेटन सिल्वाचे 8, जयेश राणेचे 5 गोल

- तिसऱ्या आयएसएल मोसमात देशॉर्न ब्राऊनचे 9 गोल

- यंदाच्या आयएसएलमध्ये पहिला स्वयंगोल नॉर्थईस्टच्या माशूर शेरीफद्वारे

- प्रिन्स इबारा याचाही पहिल्याच आयएसएल सामन्यात गोल

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com