Indian Super League: नाट्यमय लढतीत बंगळूरुनं मारलं मैदान!

Bangalore FC: फुटबॉल स्पर्धेत शनिवारी माजी विजेत्यांना १-० फरकाने विजयाचे पूर्ण तीन गुण वसूल करणे शक्य झाले.
Bangalore FC
Bangalore FCDainik Gomantak

Indian Super League: बंगळूर एफसीला शेवटची तीन मिनिटे बाकी असताना ब्राझीलियन ॲलन कॉस्ता याने आघाडीवर नेले, इंज्युरी टाईमच्या दुसऱ्या मिनिटास स्पॅनिश खेळाडू जॉन गाझ्तानागा याने बरोबरी साधून दिली, परंतु गोल अवैध ठरल्याने इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेत शनिवारी माजी विजेत्यांना १-० फरकाने विजयाचे पूर्ण तीन गुण वसूल करणे शक्य झाले.

दरम्यान, श्री कांतीरावा स्टेडियमवर घरच्या प्रेक्षकांच्या साक्षीने खेळणाऱ्या बंगळूरला नॉर्थईस्टने चांगलेच झुंजविले. ड्युरँड कप विजेत्यांसाठी ॲलन याने ८७व्या मिनिटास गोल केला. तोच अखेर निर्णायक ठरला. ९०+२व्या मिनिटास जॉन गाझ्तानागा याने गोल नोंदविला, पण यावेळी त्याचा एक सहकारी खेळाडू ऑफसाईड ठरल्याने नॉर्थईस्टला बरोबरीचे समाधान लाभले नाही. काही सोप्या संधीचे गोलमध्ये रुपांतर केले असते, तर बंगळूरुला (Bangalore) मोठा विजय नोंदविणे शक्य झाले असते.

Bangalore FC
Indian Super League: गतउपविजेत्यांची मोहीम आजपासून

गतविजेत्यांची रविवारी पहिली लढत

गतविजेता हैदराबाद एफसी (Hyderabad FC) संघ रविवारी (ता. ९) यावेळच्या आयएसएल स्पर्धेतील पहिली लढत खेळेल. माजी विजेत्या मुंबई (Mumbai) सिटी एफसीचे त्यांच्यासमोर असेल. दोन्ही संघांचा हा स्पर्धेतील पहिलाच सामना आहे. हैदराबाद येथील घरचे मैदान अनुपलब्ध असल्याने मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघ रविवारी पुणे येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल मैदानावर खेळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com