आज हैदराबाद एफसीविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी बंगळूर एफसीची वेगळी व्यूहरचना

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

फसी गोवाविरुद्ध मागील लढतीत दोन गोलांची आघाडी घेऊनही बंगळूर एफसीला इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत बरोबरीवर समाधान मानावे लागले. आज होणाऱ्या हैदराबाद एफसीविरुद्धच्या लढतीत वेगळी व्यूहरचना अमलात आणण्याचे माजी विजेत्यांचे नियोजन आहे.

पणजी :  एफसी गोवाविरुद्ध मागील लढतीत दोन गोलांची आघाडी घेऊनही बंगळूर एफसीला इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत बरोबरीवर समाधान मानावे लागले. आज होणाऱ्या हैदराबाद एफसीविरुद्धच्या लढतीत वेगळी व्यूहरचना अमलात आणण्याचे माजी विजेत्यांचे नियोजन आहे.

 

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर बंगळूर एफसी व हैदराबाद एफसी यांच्यातील सामना खेळला जाईल. हैदराबादने मागील लढतीत ओडिशा एफसीला एका गोलने हरवून पूर्ण तीन गुणांची कमाई केली होती.

 

‘‘हैदराबादविरुद्ध आमची वेगळी व्यूहरचना असेल. आमचे सर्व खेळाडू सज्ज आहेत. आम्ही हैदराबादचा ओडिशाविरुद्धचा सामना पाहिला आहे. एकंदरीत उद्याचा सामना खडतर ठरण्याची अपेक्षा आहे,’’  बंगळूर एफसीचे स्पॅनिश प्रशिक्षक कार्ल्स कुआद्रात यांनी शुक्रवारी सांगितले. एफसी गोवाविरुद्ध क्‍लेटन सिल्वा आणि ज्युआनन यांच्या गोलमुळे बंगळूरने दोन गोलांची भक्कम आघाडी घेतली होती, नंतर एफसी गोवाच्या इगोर आंगुलोने नोंदविलेल्या दोन गोलांमुळे त्यांना बरोबरीच्या एका गुणावर समाधान मानावे लागले. त्या लढतीत गमावलेल्या संधीची खंत कुआद्रात यांनी व्यक्त केली.
हैदराबाद एफसीचे स्पॅनिश प्रशिक्षक मान्युएल मार्किझही आशावादी आहेत. 

संबंधित बातम्या