बंगळूर एफसीने धडाकेबाज खेळी करत, त्रिभुवन आर्मी संघाचा धुव्वा उडवला

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 14 एप्रिल 2021

नवे प्रशिक्षक जर्मनीचे मार्को पेझ्झैऔली यांच्या मार्गदर्शनाखाली बंगळूरचा हा पहिलाच सामना होता.

पणजी: बंगळूर एफसीने धडाकेबाज खेळ करताना उत्तरार्धात पाच गोल नोंदवून एएफसी कप फुटबॉल स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील दुसऱ्या टप्प्यात नेपाळच्या त्रिभुवन आर्मी संघाचा धुव्वा उडविला. सामना बुधवारी बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर झाला.

गोलशून्य पूर्वार्धानंतर बंगळूरने उत्तरार्धात पाचही गोल केले. राहुल भेके व ब्राझीलियन क्लेटन सिल्वा यांनी प्रत्येकी दोन, तर कर्णधार सुनील छेत्री याने एक गोल केला. कोविड-१९ आजारातून सावरलेल्या छेत्रीने गोलसह पुनरागमन केले. नवे प्रशिक्षक जर्मनीचे मार्को पेझ्झैऔली यांच्या मार्गदर्शनाखाली बंगळूरचा हा पहिलाच सामना होता. (Bangalore FC thrashed Tribhuvan Army by a huge margin)

गोवा: कळंगुटमधील राष्ट्रीय पातळीवरील फुटबॉल स्पर्धा अनधिकृत

राहुल याने 51व्या मिनिटास सेटपिसेसवर शानदार हेडिंगसह गोलशून्य बरोबरीची कोंड फोडल्यानंतर पुढच्याच मिनिटास सुनील छेत्रीने आघाडी दोन गोलांनी भक्कम केली. त्यानंतर क्लेटन सिल्वा याने छेत्रीच्या असिस्टवर 61व्या मिनिटास संघाचा तिसरा गोल केला. 65व्या मिनिटास लागोपाठ दोन गोल झाले. क्लेटनने चेंडूला अचूक दिशा दाखविल्यानंतर काही सेकंदातच भेके याने गोल केला. स्पर्धेच्या पुढील फेरीत आता बंगळूर एफसीसमोर बांगलादेशचा अबाहानी ढाका लिमिटेड आणि मालदीवचा क्लब ईगल्स यांच्यातील विजेत्या संघाचे आव्हान असेल.
 

संबंधित बातम्या