नागोवा मैदानावर बंगळूर एफसीचे विजयी पंचक
Bangalore FC'sDainik Gomantak

नागोवा मैदानावर बंगळूर एफसीचे विजयी पंचक

चेन्नईला नमविले; यंग चँप्सचा जमशेदपूरला धक्का

पणजी: बंगळूर एफसीने रिलायन्स फाऊंडेशन डेव्हलपमेंट लीग फुटबॉल स्पर्धेत सलग पाचवा विजय नोंदविला. मंगळवारी त्यांनी नागोवा येथील मैदानावर चेन्नईयीन एफसीला ३-० फरकाने सहजपणे हरविले (Bangalore FC's winning five at Nagova ground )

Bangalore FC's
जीसीए प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत धेंपो क्लब उपांत्य फेरीत

बाणावली येथील मैदानावर आरएफ यंग चँप्सने जमशेदपूर एफसीला १-० फरकाने पराभवाचा धक्का दिला. निर्णायक गोल 16 व्या मिनिटास सी. के. रशीद याने थेट फ्रीकिक फटक्यावर केला. यंग चँप्सचा हा दुसरा विजय असून त्यांचे पाच लढतीतून सात गुण झाले आहेत. ते आता सलग तीन सामने अपराजित आहेत. जमशेदपूरला दुसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे पाच लढतीनंतर त्यांचे सात गुण कायम राहिले.

Bangalore FC's
आयपीएल 2022 प्लेऑफ अन् Womens T20 Challenge ची घोषणा, या ठिकाणी सामने?

लास्टबॉर्न मॉफनियांग बंगळूर एफसीच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने दोन गोल केले. त्याने अनुक्रमे २५ व ६९व्या मिनिटास चेंडूला नेटची अचूक दिशा दाखविली. अन्य एक गोल 68 व्या मिनिटास बेके ओरम याने केला. सलग पाच सामने जिंकल्यामुळे बंगळूरचे सर्वाधिक 15 गुण झाले आहेत. स्पर्धेतील तिसऱ्या पराभवामुळे चेन्नईयीनचे पाच लढतीनंतर दोन गुण कायम राहिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.