ISL Football: उपांत्य लढतीत बंगळूरचे मुंबई सिटीवर वर्चस्व

सलग दहाव्या विजयात सुनील छेत्रीचा गोल निर्णायक
ISL Football | Sunil Chhetri of Bengaluru FC
ISL Football | Sunil Chhetri of Bengaluru FCDainik Gomantak

Indian Super League Football: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सलग दहावा विजय नोंदवत बंगळूर एफसीने मंगळवारी एक पाऊल अंतिम फेरीत टाकले. उपांत्य फेरीतील पहिल्या टप्प्यात त्यांनी लीग शिल्ड विजेत्या मुंबई सिटीविरुद्ध 1-0 फरकाने विजय मिळविला.

ISL Football | Sunil Chhetri of Bengaluru FC
Team India: रवींद्र जडेजाचे बल्ले-बल्ले, कसोटी मालिकेदरम्यान ICC ने केली 'ही' मोठी घोषणा

मुंबई येथे झालेल्या उपांत्य फेरीतील पहिल्या टप्प्यात सुनील छेत्री याने 78 व्या मिनिटास साधलेले हेडिंग अचूक आणि निर्णायक ठरले. त्याने सलग दुसऱ्या लढतीत गोल केला. केरळा ब्लास्टर्सविरुद्ध नॉकआऊट लढतीत त्याचा अतिरिक्त वेळेत फ्रीकिक गोल महत्त्वपूर्ण ठरला होता. छेत्री 58 व्या मिनिटास बदली खेळाडू या नात्याने मैदानात उतरला होता.

आयएसएल उपांत्य फेरीतील दुसऱ्या टप्प्यातील सामना येत्या रविवारी (ता. 12) बंगळूर येथे होईल. तेव्हा अंतिम फेरी गाठण्यासाठी त्यांना बरोबरी पुरेशी ठरेल. बंगळूरने मुंबई सिटीला साखळी फेरीतील परतीच्या लढतीतही हरविले होते.

ओळीने 18 सामने अपराजित राहिल्यानंतर मुंबईतील संघाचा हा सलग तिसरा पराभव ठरला. अंतिम फेरी गाठण्यासाठी त्यांना पुढील सामना दोन गोलच्या फरकाने जिंकावाच लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com