Cooch Behar Trophy: फलंदाजी सुधारली, तरीही गोव्याचा पराभव

बडोदाचा सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी डाव व 83 धावांनी विजयी
Sanath, Devankumar, Yash
Sanath, Devankumar, Yash Dainik Gomantak

Cooch Behar Trophy: गोव्याने दुसऱ्या डावात फलंदाजी सुधारली. देवनकुमार चित्तेम, सनथ नेवगी, यश कसवणकर यांनी अर्धशतके नोंदविली, पण ते मोठा पराभव टाळू शकले नाहीत. 19 वर्षांखालील कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेत सोमवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच बडोद्याने डाव व 83 धावांनी विजय प्राप्त केला.

Sanath, Devankumar, Yash
IPL 2023 मध्ये 'हा' स्टार खेळाडू खेळणार नाही, अचानक घेतला मोठा निर्णय !

सामना बडोदा येथील मोतीबाग क्रिकेट मैदानावर झाला. बडोद्याने सलग दुसरा सामना डावाने जिंकून एकूण गुणसंख्या 14 वर नेली, तर गोव्याला लागोपाठ दुसऱ्या लढतीत डावाने पराभव पत्करावा लागला. अगोदरच्या लढतीत त्यांना पंजाबने डाव व 74 धावांनी हरविले होते. गोव्याचा स्पर्धेतील तिसरा सामना 19 नोव्हेंबरपासून गुजरातमधील आनंद येथे अरुणाचल प्रदेशविरुद्ध होईल.

गोव्याने पहिल्या डावातील 373 धावांच्या पिछाडीवरून काल बिनबाद 72 धावा केल्या होत्या. आज त्यांचा डाव 290 धावांत आटोपला. गोव्याने शेवटच्या सहा विकेट्स 55 धावांत गमावल्या, त्यामुळे त्यांना गुजरातला पुन्हा फलंदाजीस पाचारण करणे शक्य झाले नाही. सलामीच्या देवनकुमार चित्तेम याने 75 चेंडूंत 15 चौकारांच्या मदतीने आक्रमक 76 धावा केल्या. त्यानंतर सनथ नेवगी (79 धावा, 93 चेंडू, 12 चौकार, 2 षटकार) व यश कसवणकर (62 धावा, 113 चेंडू, 10 चौकार) यांनी पाचव्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी केली. सनथ बाद झाल्यानंतर गोव्याची घसरगुंडी उडाली.

Sanath, Devankumar, Yash
T20 World Cup 2022 मध्ये या 5 खेळाडूंनी ठोकले सर्वाधिक षटकार, सूर्याचाही जलवा

संक्षिप्त धावफलक

बडोदा, पहिला डाव ः ४९५

गोवा, पहिला डाव ः 122 व दुसरा डाव ः 80.3 षटकांत सर्वबाद 290 (वीर यादव 24, देवनकुमार चित्तेम 76, दीप कसवणकर 7, इझान शेख 18, सनथ नेवगी 79, यश कसवणकर 62, वर्धन मिस्कीन 4, रिजुल पाठक 10, फरदीन खान नाबाद 2, शिवांक देसाई 0, राजन सरोज 0, राज लिंबानी 2-71, शैलेंद्र यादव 2-83, प्रियांशू मोलिया 5-65).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com